मुख्य बातम्या

MEPL च्या विरोधात खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याप्रमाणे विधानसभेत आवाज उठवणार; अ‍ॅड अशोक पवार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहती मधील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड (MEPL) या कंपनी विरोधात निमगाव भोगी ग्रामस्थांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर लोकसभेमध्ये संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांनी ज्या पद्धतीने आवाज उठवला. तसाच आवाज विधानसभेतही उठवणार असल्याचे प्रतिपादन आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनी केले.

निमगाव भोगी व परिसरात MEPL कंपनीच्या दुषित पाण्यामुळे जमीन मोठ्या प्रमाणात नापीक झाली आहे. माणसांचे व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे निमगाव भोगी येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. या पार्श्वभुमीवर नुकतीच निमगाव भोगी येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांची एक बैठक झाली असुन उद्या २० सप्टेंबर २०२४ रोजी पुणे-नगर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याच अनुषंगाने शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनी निमगाव भोगी गावातील ग्रामस्थांची भेट घेऊन कंपनीच्या प्रदूषित पाण्याने बाधित झालेल्या परिसराची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचेही सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुर-आंबेगावचे अध्यक्ष काँग्रेसचे शेखर पाचुंदकर, शिरुर-आंबेगाव काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत पाचंगे, वाल्मिक कुरुंदळे, निमगाव भोगीच्या सरपंच उज्वला अंकुश इचके, लक्ष्मण सांबारे, माजी सरपंच उत्तम व्यवहारे, उज्वला कौतिक इचके, विठ्ठल पवार, संतोष शिंदे, संजय देशमुख, सागर नरवडे यांसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

MEPL च्या विरोधात अनेकवेळा आंदोलन..

.रांजणगाव औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड (MEPL) कंपनी २००८ साली सुरु झाली. त्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या कंपनीमुळे पाणी प्रदुषन होत असल्याबाबत आंदोलने केली. परंतु कंपनी प्रशासनाने कोणालाही जुमानले नाही. त्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही निमगाव भोगी येथील ग्रामस्थांसोबत कंपनी परिसरात पाहणी करत  MEPL कंपनीला अतिरिक्त जमीन देऊ नये अशी मागणीही केली होती. परंतु त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ च आहे.

 

खासदार कोल्हे यांनी उठवला लोकसभेत आवाज…
शिरुर लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपुर्वी रांजणगाव औद्योगिक वसाहत नॉन केमिकल झोन असुन महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड (MEPL) कडुन सोडल्या जाणाऱ्या केमिकलमिश्रीत पाण्यामुळे होणारे प्रदुषण गंभीर असून अण्णापूर, निमगाव भोगी, ढोकसांगवी, कर्डेलवाडी, सरदवाडी आदी गावातील विहीरी व तलावांचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्याचबरोबर शेतजमिनी नापीक होत असल्याबाबत खासदार डॉ कोल्हे यांनी प्रदुषणामुळे ज्या गावांचे नुकसान झाले आहे, त्या गावातील जलस्रोत व मृदा सुधारणेसाठी तातडीने पावलं उचवावीत अशी मागणी लोकसभेत केली होती.

 

डॉ कोल्हे नंतर विरोधी पक्षाचे पुढारी ऍक्शनमोड मध्ये…
खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी लोकसभेत MEPL च्या विरोधात आवाज उठवल्यानंतर विरोधी पक्षातील काही राजकीय पुढारी जागे झाले. त्यानंतर त्यांनी एकत्र बैठका घेतल्या आणि उद्या (दि २०) रोजी MEPL च्या विरोधात आक्रमक भुमिका घेत पुणे-नगर महामार्ग रोखण्याचा इशारा दिला. परंतु खासदार कोल्हे यांनी MEPL च्या विरोधात भुमिका घेण्याच्या आधी या राजकीय पुढाऱ्यांनी कंपनीच्या विरोधात भुमिका का घेतली नाही असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारत असुन जर MEPL कंपनी बंद पडली. तर खासदार कोल्हे यांना श्रेय जाऊ नये. यासाठी विरोधी पक्षाच्या स्थानिक पुढाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

रांजणगाव येथील जल प्रदुषण करणाऱ्या MEPL कंपनीवर बंदी आणा खासदार डॉ अमोल कोल्हे यांची लोकसभेत मागणी

रांजणगाव MIDC तील MEPL कंपनी १० ते १५ दिवस बंद ठेवण्याचे MIDC चे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांचे आदेश

रांजणगाव MIDC तील MEPL कंपनीच्या दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांची उद्योगमंत्र्याकडे धाव

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

8 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

8 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

8 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

9 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

9 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

9 तास ago