मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची दारुची भट्टी उध्वस्त करत प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पहिल्या कारवाईत निमोणे येथे घोडनदीच्या किनारी उसाच्या शेतात सुरु असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी कच्चे रसायन, तयार दारु, केमिकलयुक्त ताडी आणि टोयोटा ग्लान्झा कार असा एकूण ५ लाख ४१ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

तर दुसऱ्या कारवाईत आंबळे येथील हॉटेलमधून ९,०७६ रुपयाचा किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसालासदृश माल जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवायांमुळे तालुक्यातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचे स्पष्ट झाले आहे.

निमोणे येथे उसाच्या शेतात हातभट्टी; पाच जणांविरुद्ध गुन्हा
शिरुर पोलिसांना २४ ऑक्टोबर रोजी निमोणे गावच्या हद्दीतील घोडनदीच्या किनारी, गट क्रमांक ४८९ मधील उसाच्या शेतात गावठी हातभट्टीची दारु तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांनी पोलीस पथकासह पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी छापा टाकला. यावेळी हातभट्टीसाठी कच्चे रसायन साठवून दारु तयार केली जात असल्याचे तसेच विक्रीसाठी तयार गावठी दारु आणि केमिकलयुक्त ताडी ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित आरोपी घटनास्थळावरुन पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत दोन निळ्या ड्रममधील २०० लिटर कच्चे रसायन, लोखंडी बॅरलमधील आणखी २०० लिटर कच्चे रसायन, पाच लिटर गावठी दारू, पाच लिटर केमिकलयुक्त ताडी, हातभट्टीसाठी वापरण्यात येणारी उपकरणे आणि टोयोटा ग्लान्झा कार (क्रं एम एच १२ झेड जी ८१८४) असा एकुण ५ लाख ४१ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी लता जंबु चौघुले, प्रियंका राजेंद्र चौघुले, रवि जंबु चौघुले, विकी जंबु चौघुले आणि राजेंद्र रोहीदास चौघुले (सर्व रा. निमोणे, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबळेत हॉटेलमधून प्रतिबंधित गुटखा जप्त…
दुसरी कारवाई २५ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे एक वाजता आंबळे येथील श्रीदत्त अमृततुल्य हॉटेलमध्ये करण्यात आली. संदीप सोमनाथ फुलपगर (वय २४, रा. आंबळे) याच्याकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व पानमसालासदृश पदार्थांचा साठा विक्रीच्या उद्देशाने ठेवला असल्याचे आढळले. पोलिसांनी ९,०७६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

अवैध धंद्यांवर नियंत्रणाचे आव्हान…
निमोणे येथील हातभट्टी आणि आंबळे येथील गुटखा प्रकरण या दोन्ही कारवाया वेगवेगळ्या स्वरुपाच्या असल्या, तरी त्यातून अवैध उत्पादन आणि विक्रीवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विशेषतः मानवी आरोग्याला धोका निर्माण करु शकणाऱ्या केमिकलयुक्त पदार्थांची विक्री आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य उत्पादनांचा पुरवठा रोखण्यासाठी केवळ छापे नव्हे, तर अशा व्यवसायांच्या स्रोतांवरही कारवाई होणे महत्त्वाचे आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले तसेच पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले आणि त्यांच्या पथकाने केली. हातभट्टी प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार टेंगले करीत आहेत. दरम्यान, अवैध दारु निर्मिती, केमिकलयुक्त ताडी किंवा प्रतिबंधित गुटख्याची विक्री आढळल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन शिरुर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

Video: घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशाकडे घोड पाटबंधारे व महसूल विभागाचे दुर्लक्ष…?

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

कोंढापुरीत तरुणावर चाकूने वार करत खून; शिक्रापुर पोलिसांनी १२ तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्याने सात जणांनी शेतकऱ्याला मारहाण करत कारच्या काचा फोडल्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रस्त्याच्या मध्यभागी उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन काही गुंड…

2 तास ago

अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणणारच! जय पवारांचा निर्धार; CID तपासाचा घेतला आढावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची…

4 तास ago

महाराष्ट्राला ‘झाडखाऊ’ मुख्यमंत्री नको! टोरंट प्रकल्पावरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात

‘विकासाला विरोध नाही, विनाशाला विरोध’; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीची उद्या सपकाळ करणार पाहणी मुंबई: कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल! उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते, झिशान सिद्दीकींकडे मुंबईची धुरा

सुनेत्रा पवारांकडून नियुक्त्यांची घोषणा; पार्थ पवारांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक…

4 तास ago

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींना हात लावाल तर रस्त्यावर उतरू; विजय वडेट्टीवारांचा इशारा

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करण्यास विरोध करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय…

4 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद पेटला; दगड अन् कुऱ्हाडीने मारहाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याचा जाब विचारणे आणि…

9 तास ago