क्राईम

शिरूर तालुक्यात जावयाने पाडला सासऱ्याचा दात…

शिक्रापूर: कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील गारकोलवाडी येथे सासरी आलेल्या जावयाने पत्नीसह सासरे व मेव्हण्याला मारहाण करत सासऱ्याचा दात पाडल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गणेश सावकार शिंगाडे व मंदाबाई सावकार शिंगाडे या माय लेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील गारकोलवाडी येथील हरिभाऊ रुपनेर यांची मुलगी प्रियांका माहेरी आली होती. तिचा पती गणेश शिंगाडे व सासू मंदाबाई शिंगाडे हे दोघे घरी आले त्यांनी प्रियांका हिस तुला सासरी यायचे नाही का? असे विचारले. त्यावेळी वाद झाल्याने तिच्या पती व सासूने तिला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी प्रियांकाचे भाऊ व वडील मध्ये गेले असता गणेशने काठी व दगडाने दोघांना मारहाण करत जखमी केले.

दरम्यान गणेश याने दगडाने मारहाण करत हरिभाऊ यांचा दात पाडला. याबाबत हरिभाऊ रामू रुपनेर (वय ५२ वर्षे रा. गारकोलवाडी कान्हूर मेसाई ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी गणेश सावकार शिंगाडे व मंदाबाई सावकार शिंगाडे (दोघे रा. वरुडे ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय चौधरी हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

15 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

19 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

19 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

20 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

20 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

21 तास ago