क्राईम

शिरूर तालुक्यात महिलेस शिवीगाळ करून मारहाण; गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील चांडोह येथे किरकोळ वादातून महिलेस व तिच्या मुलाला व सुनेला शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य हरीभाऊ पानंमद आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिवाजी रोकडे (दोघे रा. चांडोह ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडोह (ता.शिरूर जि. पुणे) येथील कुणाल गोडसे यांच्यासोबत शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळच्या सुमारास आदीत्य पानमंद व ज्ञानेश्वर रोकडे यांचा किरकोळ वाद झाला. या किरकोळ वादाचा राग मनात धरून पानंमद आणि रोकडे यांनी गोडसे यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ व दमदाटी केली. त्यावेळी कुणालची आई रेश्मा गोडसे या भांडण सोडविण्यासाठी आल्या व त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना व त्यांच्या सुनेला शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी आदित्य पानंमद याने त्यांच्या हाताला चावा घेऊन दुखापत केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. रेश्मा गोडसे (रा. चांडोह ता. शिरूर) यांनी याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास शिरूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल आगलावे हे करत आहेत.

संतापजनक! तळेगाव ढमढेरे आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका वाहते चक्क बिर्याणीचे पातेले…

शिरूर! कोरेगाव भीमा येथे खाजगी बसला भीषण आग…

शिरूर! हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत पोलिसांचेही डोळे पाणावले…

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…

Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…

शिरूर (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भरदिवसा आज (रविवार) दुपारी पावणे चार वाजण्याच्या…

2 दिवस ago

Video; रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील उज्जैन यात्रेच्या बसवर अज्ञातांकडुन दगडफेक

शिरुर (तेजस फडके) रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर तसेच…

2 दिवस ago

संतापजनक! तळेगाव ढमढेरे आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका वाहते चक्क बिर्याणीचे पातेले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : ग्रामीण भागात रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने शासनाने आरोग्य…

2 दिवस ago

शिरुरच्या नेमबाजांचा राज्यस्तरावर डंका समृद्धीला रौप्य तर श्रावणीला कांस्यपदक

शिरुर (अरुणकुमार मोटे) नागपुर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरुर तालुक्याच्या दोन…

3 दिवस ago

रांजणगाव पोलिस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘एकता दौड’

रांजणगाव गणपती (तेजस फडके) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता दिवस (Run…

3 दिवस ago

शिरूर! कोरेगाव भीमा येथे खाजगी बसला भीषण आग…

कोरेगाव भीमा (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ आज (गुरुवार) आठवडे बाजाराच्या…

4 दिवस ago