शिरुर (तेजस फडके) रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर तसेच शेखर पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखाली श्री महाकालेश्वर उज्जैन दर्शनासाठी निघालेल्या बसवर श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे अज्ञातांकडुन दगडफेक करण्यात आली. या बसमध्ये महिला आणि लहान मुलेही प्रवास करत होते. या घटनेमुळे भाविकांकडुन संताप व्यक्त केला जात आहे.
श्री महाकालेश्वर उज्जैन यात्रेवर झालेल्या या हल्ल्याने भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तसेच ‘अजुन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा ढोल वाजलेला नाही. तरीही विरोधक एवढे घाबरले आहेत की देवाच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांवरती भ्याड हल्ले करुन त्यांना अडवू पाहत आहेत’ अशी टिकाही भाविकांनी केली आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बसमधील भाविकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र बसचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असुन, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरु केली आहे. दगडफेक नेमकी कोणी आणि कोणत्या हेतूने केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच सुपा (ता. पारनेर) पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
शिरुरच्या नेमबाजांचा राज्यस्तरावर डंका समृद्धीला रौप्य तर श्रावणीला कांस्यपदक
रांजणगाव पोलिस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौड
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…