मुख्य बातम्या

शिरुरच्या नेमबाजांचा राज्यस्तरावर डंका समृद्धीला रौप्य तर श्रावणीला कांस्यपदक

शिरुर (अरुणकुमार मोटे) नागपुर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरुर तालुक्याच्या दोन मुलींनी नेमबाजी प्रकारात कौतुकास्पद मिळवलं आहे. शिरुरच्या युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या समृद्धी अजय चव्हाण तसेच श्रावणी संतोष वाळके यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळवत शिरुरचा झेंडा राज्यस्तरावर फडकावला आहे.

या स्पर्धेत १० मीटर पिप साईट एअर रायफल या प्रकारात समृद्धी अजय चव्हाण (विद्याधाम प्रशाला, शिरुर) हिने १४ वर्षे वयोगटात (४१०.२) गुणांची कमाई करत रौप्य पदक पटकावले. तर श्रावणी संतोष वाळके (कारेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल, कारेगाव) हिने १९ वर्षे वयोगटात (४१४.७) गुणांची कमाई करत कांस्यपदक मिळवले.

 

या दोन्ही दोन्ही नेमबाज विद्यार्थिनींची भोपाळ (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ साठी निवड झाली असुन, त्यांच्या या कामगिरीमुळे शिरुरचा मान उंचावला आहे. या दोन्ही नेमबाज विद्यार्थिनी छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेअंतर्गत युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लब, शिरूर येथे प्रशिक्षक शरद तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र थिटे, उपाध्यक्ष धनंजय थिटे यांनी समृद्धी व श्रावणीचे अभिनंदन करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

रांजणगाव पोलिस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘एकता दौड’

रांजणगाव एमआयडीसी पोलीसांकडून सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रम

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

5 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

9 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

9 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

9 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

9 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

10 तास ago