क्राईम

धक्कादायक! जन्मदात्या वडिलांनीच अल्पवयीन मुलाची केली जाळून हत्या, पहा कारण…

पाकिस्तान: वर्गात गृहपाठ पुर्ण न केल्यामुळे जन्मदात्या वडिलांनीच आपल्या मुलाची जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या कराची शहरात घडली. आपल्या अल्पवयीन मुलाला पेटवून दिल्याप्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, रईस अमरोवी कॉलनीत आरोपी वडील नजीर याने 12 वर्षीय मुलगा शाहीर याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना (दि.14) सप्टेंबर रोजी घडली.

आरोपीला सोमवारी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला (दि. २४) सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुरुवातीच्या तपासणी दरम्यान आरोपी नजीरने तपासकर्त्यांना सांगितले की, त्याचा आपल्या मुलाची हत्या करण्याचा हेतू नव्हता. मुलाचा शाळेचा गृहपाठ होत नसल्यामुळे त्याला घाबरवण्यासाठी त्याने अंगावर रॉकेल शिंपडल्याचे आरोपीने सांगितले. आरोपीने सांगितले की, मुलाला घाबरवण्यासाठी त्याने मॅच पेटवली होती पण तेलाने पेट घेतला आणि मुलगा भाजला.

पोलिसांनी सांगितले की, मुलगा गंभीर भाजल्यानंतर त्याला जवळच्या सिंध सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला कराची येथील डॉ. रुथ केएम फाऊ सिव्हिल हॉस्पिटल (CHK) च्या बर्न सेंटरमध्ये पाठवण्यात आले. बर्न सेंटरमध्ये उपचारादरम्यान शाहीरचा मृत्यू झाला. मृताच्या आईच्या तक्रारीवरुन वडिलांना अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

16 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

16 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

16 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago