Categories: इतर

ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या कदमांचा शिरुरमध्ये जाहीर निषेध…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिवसेना पुणे जिल्हा व शिवसेना युवासेना शिरुर महिला आघाडी यांच्या वतीने ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या गद्दार रामदास कदम यांचा जाहीर निषेध करुन रामदास कदम च्या प्रतिमेस उलटे करुन जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तर ओला दुष्काळ जाहीर करावा यामागणी करिता तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आणि ठाकरे कुटुंबाविषयी काढलेल्या अभद्र वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी तहसिल कार्यालय शिरुर येथे आंदोलन करण्यात आले. तसेच सलग 3 महिन्यांपासून होणाऱ्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली.

या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, शिरूर आंबेगाव तालुकाप्रमुख गणेश जामदार, शिवसेना शिरुर शहरप्रमुख सुनील जाधव, शेतकरी सेनेचे योगेश ओव्हाळ, जिल्हा संघटक संजय देशमुख, जिल्हा सल्लागार कैलास भोसले, माजी तालुकाप्रमुख अनिल कोल्हे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, उपतालुका प्रमुख अनिल पवार, संतोष काळे, तालुका महिला आघाडीचे संगीता शिंदे, सुमन वाळुंज, उपतालुका प्रमुख अमोल हरगुडे, लालासाहेब वाघचौरे, उपशहर प्रमुख पप्पूदादा गव्हाणे, विभागप्रमुख निलेश गवळी, विशाल फलके, निलेश जगताप, युवासेना उपतालुकाधिकारी राहुल मोहळकर, युवासेना उपशहर अधिकारी अण्णा रेड्डी, आकाश क्षिरसागर, कुंडलिक पवार, दिने जगताप, भिमराव कुदळे, ज्येष्ठ शिवसैनिक खुशाल बाप्पू गाडे, आबासाहेब काळे, अनिल कर्पे, विभाग प्रमुख पोपट ढवळे, सुनील जठार, महेंद्र येवले, सुरज काळे, सिद्धांत चव्हाण, आकाश चौरे, यश धनी, सुरेश आरेवार, शिवसेना, युवासेना, शेतकरी सेना, महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रामदास कदम गद्दार आहे त्याचे करायचे काय खाली डोके वर पाय… शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ची नाही कुणाच्या बापाची …ed सरकार हाय हाय… गेल्या 3 महिन्यांपासून शिरुर तालुका व राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून सतत पडणारे या पावसामुळे शेती पिके शेतीमाल, अरणीतील कांदे, रोपे यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणी सापडला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तरी अद्याप त्या ठिकाणी चे पंचानामे नाहीत. यामुळे शेतकरी वर्ग अडचणी सापडला आहे लवकरात लवकर पंचनामे करुन या शेतकऱ्यांना मदत मिळावी व संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी शेतकरी सेनेचे योगेश्वर व उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, आंबेगाव शिरुर प्रमूख गणेश जामदार यांनी केली.

शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची असून आल्या गेल्या आणि गद्दारांची नाही या पुढील काळात गद्दारांना धडा शिकवणार असल्याचे शिरुर शहर प्रमुख सुनिल जाधव यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान…

5 तास ago

ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात.…

6 तास ago

वाघाळे येथे वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल

कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर…

8 तास ago

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली पण ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात…

8 तास ago

शिरूर तालुक्यातील दरोड्यादरम्यान महिलेचा खून; आरोपी गजाआड…

शिक्रापूर : जातेगावमध्ये (ता. शिरूर) ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे…

15 तास ago

सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली, पण शेतकऱ्यांना फायदा नाहीच…

पुणे: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवली असली तरी, दुसऱ्या बाजूला 550 डॉलर प्रति मेट्रिक…

16 तास ago