क्राईम

धक्कादायक! आधी त्याने पत्नीला झोपेतून उठवलं अन मग…

मुंबई: एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा खून केला आहे. गाझियाबाद जिल्ह्यातील मसुरी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या पत्नीचा बॅटने मारहाण केली नंतर गळा दाबून खून केला. या घटनेनंतर आरोपी तरुण त्याच्या कुटुंबीयांसह घटनास्थळावरुन फरार झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिसलगढी येथील कॅफे ऑपरेटर गौरवचा विवाह 9 महिन्यांपूर्वी खोडा येथील रहिवासी जयवीर सिंग हिच्यासोबत झाला होता. तो दुसऱ्या मजल्यावर पत्नीसह राहत होता तर तळमजल्यावर 2 भाऊ आणि आई-वडील राहत होते. गौरव व्यसनी असल्याने लग्नानंतर काही महिन्यांपासून दोघांमध्ये हुंड्यावरुन वाद झाला.

मसुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी रवींद चंद पंत यांनी सांगितले की, रविवारी रात्रीही गौरव आणि टीनामध्ये वाद झाला होता. सोमवार (दि. 5) रोजी पहाटे 4 वाजता नशेत असलेल्या गौरवने बेसबॉलच्या बॅटने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा होऊनही घरात उपस्थित असलेल्या एकाही सदस्याने वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. टीना बेशुद्ध पडल्यावर त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि घरातून पळ काढला.

पोलिसांनी गोविंदपुरम येथील उद्यानातून बेशुद्ध अवस्थेत गौरवला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने सांगितले की, त्याचे लग्न 9 महिन्यांपूर्वी डिसेंबर 2021 मध्ये टीनाशी झाले होते. आपल्या धाकट्या भावाची ती खूप काळजी घेत असल्याने टीनाचे आपल्यावर प्रेम नाही असे त्याला वाटले. त्यामुळे दोघांमध्ये काही तरी आहे असा संशय त्याला आला. मात्र, त्याचा कोणताही पुरावा त्याला सापडला नाही.

टीनापासून त्याला वेगळे व्हायचे आहे. त्यासाठी तो 2 दिवसांपूर्वी घरातून पळून जयपूरला गेला होता. कुटुंबीयांनी तेथे पोहोचून रविवारी त्यांना तेथून घरी आणले. तो रात्रीच आला होता. अशी माहिती घरच्या व्यक्तींनी दिली. त्याने दारु प्यायली होती. त्याला वाटले की अशा प्रकारे आपण वेगळे होऊ शकणार नाही, म्हणून त्याने तिला मारण्याचा निर्णय घेतला. पहाटे चार वाजता त्यांचे डोळे उघडले. टीना झोपली होती. त्याला उठवून खोलीचा दरवाजा बंद करुन मारहाण केली.

बेसबॉलच्या बॅटने डोक्यावर हल्ला केला. त्याला वाटले की तिचा श्वास अजून सुरु आहे. त्यानंतर त्याने गळा दाबून तिचा खून केला. घरातील लोकही आले होते पण कोणी काही बोलले नाही. थोड्या वेळाने तो पळून गेला.टीनाच्या हत्येमध्ये वापरलेली बेसबॉल बॅट आणि ओढणी पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पत्नीवर संशय असल्याने त्याने हत्या केल्याचं बोललं जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

12 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago