शिरुर (तेजस फडके) पुणे ते माजलगाव दरम्यान प्रवास करणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसमधील कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना शिरुर एसटी डेपो येथे तीन जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली असुन याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये तीन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंडक्टरच्या तक्रारीनुसार, प्रवाशांनी भरलेल्या एसटीमध्ये एक प्रवासी मोठ्या प्रमाणात छत्र्यांचा साठा घेऊन चढण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी कंडक्टरने त्याला विनम्रपणे सांगितले की बसमध्ये जागा नाही, कृपया दुसऱ्या बसने प्रवास करावा. मात्र, यावर संतापून संबंधित प्रवाशाने “एसटी तुझ्या बापाची आहे का?” असे अपमानास्पद शब्द वापरून कंडक्टरला लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर त्या प्रवाशाने आणखी दोन व्यक्तींना फोन करून बोलावले आणि त्यांनी मिळून चालकालाही मारहाण केली.
या हाणामारीत कंडक्टरच्या खिशातील अंदाजे २१ हजार रुपये गहाळ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…