शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील चेअरमन वस्ती परिसरात पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयितपणे फिरणाऱ्या युवकाला शिक्रापूर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जेरबंद करत त्याच्यावर गुन्हे दाखल करुन त्याला अटक केली असून नितीन मल्लिनाथ पाटील असे शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील चेअरमन वस्ती परिसरात नवनाथ दरेकर यांच्या घराच्या परिसरात चोर आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यांनतर पोलीस नाईक अतुल पखाले, होमगार्ड मनोहर पुंडे यांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता त्यांना तेथे एक युवक संशयितपणे दिसून आला मात्र तो पळून जाऊ लागला. दरम्यान पोलिसांनी येथील नवनाथ दरेकर, संपत दरेकर, संतोष राजळे यांच्या मदतीने सदर युवकाला पकडले त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला.
दरम्यान सदर युवक हा चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत पोलीस नाईक अतुल पखाले रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नितीन मल्लिनाथ पाटील (वय २१) रा. वांगी मंदृप ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रविकिरण जाधव हे करत आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…