क्राईम

नगरसेविकेला ब्लॅकमेल करत मागितली 25 लाखांची खंडणी…

पुणे: पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करीत एका नगरसेविकेला माहिती अधिकार कार्यकर्त्याने 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर नगरसेवक पद घालवू, अशी धमकी देत ही खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांत संबंधित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र अशोक भोसले (रा. विमाननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

भोसले याच्याविरुद्ध यापूर्वी खंडणीचे ३ व इतर ३ गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी नगरसेविकेच्या पतीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भोसले याने फिर्यादी यांच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम करीत असल्याचे कारण सांगून त्याबाबत पुणे महानगरपालिका व PMRD येथे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, यासाठी अर्ज केले होते.

या अर्जाची तपासणी होऊन कोणतेही बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचा निर्वाळा PMRD ने दिला होता. तरीही ‘महापालिका निवडणुकीत तुमची व तुमच्या पत्नीची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करेल’ अशी भीती दाखवून भोसले याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. इतकंच नाही तर संबधित व्यक्तीने 23 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेटून नगरसेविकेच्या पतीकडे 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणीही केली. हा प्रकार सातत्याने होत असल्याने अखेर फिर्यादीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

मात्र, त्यावर काही कारवाई झाली नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यांच्या अर्जाची चौकशी करुन विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राज ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे विकासाच्या रोडमॅपने उत्तर

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ वेगाने पुढे जात असताना ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित…

2 तास ago

शिल्पकलेतील आधुनिक तंत्रज्ञान अन् व्यावसायिक संधींवर मार्गदर्शन; १५० हून अधिक विद्यार्थी-शिल्पकारांचा सहभाग

पुणे : ‘संघटित शिल्पकार संघ, महाराष्ट्र राज्य’ आणि एम.आय.टी. ए.डी.टी. विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष…

2 तास ago

सीमेवर जवानांचे रक्त, महाराष्ट्रातून रक्तदानाची साथ; ‘सिंदूर महारक्तदान’मधून शिंदेंचा राष्ट्रभक्तीचा संदेश

नवी दिल्ली: सीमेवर देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी रक्तदानातून…

2 तास ago

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगला डिजिटल बूस्टर; छोट्या बँकांनाही अत्याधुनिक सुविधा मिळणार; अमित शाह

मुंबई: देशातील शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानसक्षम बनवून जागतिक स्पर्धेसाठी सक्षम करण्यासाठी…

6 तास ago

ओबीसींची संख्या ६० टक्के असताना २८-३० टक्के दाखवणे खपवून घेणार नाही; वडेट्टीवारांचा सरकारला इशारा

नागपूर: ईम्पिरिकल डेटाच्या नावाखाली ओबीसींची वास्तविक लोकसंख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात आहे. ओबीसींची…

6 तास ago

नाशिक-पुणे रेल्वेचा मूळ मार्ग बदलू नका; ६० दिवसांत निर्णय द्या! चक्काजाम आंदोलनाने रस्ते दणाणले

नाशिक: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मूळ मार्ग कोणत्याही परिस्थितीत बदलू नये, या मागणीसाठी क्रांती…

6 तास ago