क्राईम

पत्नीचा मृतदेह बाहेर काढत होते तेच पतीनेही संपवलं आपल जीवन…

नाशिक: नाशिक जिल्ह्यात पतीपतीने आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या 2 मुलांवरील आईवडिलांचं छत्र हरपलं आहे. आता या कोवळ्या वयातील मुलाचं भविष्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या हृदयद्रावक घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात ही काळीज पिळवटून टाकणारी घडना उघडकीस आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे इथं एका पत्नीने आत्महत्या केली. विहिरीतून उडी टाकून या महिलेनं जीव दिला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पत्नीचा मृतदेह विहिरीतून काढण्याचं काम सुरु होतं. इतक्यात आत्महत्या केलेल्या पत्नीच्या पतीनेही त्याच विहिरीत उडी टाकली आणि आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

काळीज सुन्न करणारी घटना

रुपाली प्रकाश याळिज आणि प्रकाश शंकर याळिज असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. बागलाण तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्हा या घटनेनं हादरुन गेला आहे. रुपाली प्रकाश याळिज यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरु होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. पत्नीशिवाय आता आपण जगून काय करणार? या विवंचनेत असताना पतीनेही त्याच वेळी टोकाचं पाऊल उचललं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

5 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

8 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

10 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago