मुंबई: धार्मिक रितीरिवाज पाळत नाही आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मिय विवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केली आहे.
टिळकनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. आरोपी पतीने आपल्या 23 वर्षीय पत्नीचा भरदिवसा चाकूने गळा चिरुन खून केला. पहिल्या पत्नीकडून मूल होत नाही म्हणून इक्बाल शेखने रुपाली चंदनशिवेसोब विवाह केला होता. दोघांना एक मुलगाही आहे. इक्बाल आणि त्याचे कुटुंबीय रुपालीला नेहमी मुस्लिम चालीरीतींचे पालन करण्यास आणि बुरखा घालण्यास सांगत होते. पण रुपालीला हे मान्य नव्हते.
यावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडण देखील झाले. त्यामुळे रुपाली इक्बालपासून वेगळी राहू लागली. मात्र, दोघांमध्ये फोनवर वारंवार बोलणे होत होते. सोमवारी इक्बालने रुपालीला भेटण्यासाठी बोलावले. याच गोष्टीवरुन दोघांमध्ये पुन्हा वाद सुरु झाला. रागाच्या भरात रुपालीने आरोपी पतीकडे घटस्फोट मागितला होत.
सुरुवातीला इक्बालने मुलाचा हवाला देत त्यांची समजूत घालण्यास सुरुवात केली. मात्र रुपाली घटस्फोटाच्या मुद्द्यावर ठाम असताना इक्बालने रुपालीला रस्त्यावर ओढले. त्यानंतर चाकूने गळा चिरला. त्यामुळे रुपालीचा जागीच मृत्यू झाला. रुपालीचा आरडाओरडा ऐकून लोक तेथे जमा होऊ लागले. लोकांना पाहताच इक्बालने तेथून पळ काढला.
लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुपालीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला आणि काही वेळातच त्याला अटक केली.
पोलीस चौकशीत इक्बालने सांगितले की, हा त्याचा दुसरा विवाह होता. यापूर्वीही त्याचे लग्न झाले होते. पण पहिल्या पत्नीपासून त्याला मूल होत नसल्याने इक्बालने तिला घटस्फोट दिला. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्याने रुपाली चंदनशिवेसोबत लग्न केले. रुपाली आणि तिचा मुलगा इक्बालसोबत राहत होते. मात्र रुपाली काही दिवसांपूर्वी त्याच्यापासून वेगळे राहू लागली. सोमवारी भांडणानंतर तो चिडला आणि त्याने रुपालीचा चाकूने गळा चिरुन खून केला.
महाराष्ट्रात पसरतंय लव्ह जिहादचं जाळं?
देशभरात वारंवार लव्ह जिहादच्या घटना समोर येत असल्याने महाराष्ट्रातही याचा प्रसार होतोय का अशी चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांवरुन लव्ह जिहादबाबतही महाराष्ट्रात चर्चा सुरु झालीय. काही दिवसांपूर्वी अमरावतीचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी लव्ह जिहाद असल्याचा दावा केला होता.
धारणी येथे राहणाऱ्या एका हिंदू तरुणीला मुस्लिम तरुणाने पळवून नेले आणि अमरावतीत आणले. जिथे तिचा चंद्रविला ट्रस्टमध्ये विवाह झाला. या प्रमाणपत्रावर काजीने सही केल्याची माहिती समोर आली. यानंतर लव्ह जिहाद अंतर्गत मुस्लिम तरुण तरुणींना टार्गेट करत असल्याचा आरोप खासदार बोंडे यांनी केला होता.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…