क्राईम

त्या प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर…

मुंबई: मुंबईच्या आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेगावमधील ओबेरॉय संकुलातील इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणीने नैराश्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. तरुणीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंबईतील ओबेरॉय संकुलातील ही चौथी आत्महत्येची घटना असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील नामांकित विद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये ही तरुणी शिक्षण घेत होती. तिचे वडील मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असल्याचं सांगण्यात येत आहे.

तरुणीच्या घरात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोणी नव्हतं. त्यामुळे तरुणीने इमारतीच्या 23व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही शेवटच्या चिठ्ठी लिहिली नव्हती.

तरुणीने इमारतीवरून उडी मारल्यानंतर मागील काही दिवसांपासून तिच्यावर अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. तरुणीच्या मृत्यूनंतर परिसरातील लोकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी आरे पोलिसांत अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

मागील सहा महिन्यांत ओबेरॉय संकुलातील विविध इमारतींमधून आतापर्यंत चौघांनी आत्महत्या केली आहे. जुलै महिन्यात अनंत द्विवेदी(२२) या तरुणीने आत्महत्या केली. मे महिन्यात १७ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. नागरिकांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

1 मिनिट ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

41 मिनिटे ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

2 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

18 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

22 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

22 तास ago