महाराष्ट्र

जयकुमार गोरेंनी दाखवला राज ठाकरेंना आरसा

मुंबई: महाराष्ट्रात अपक्ष आमदारही निवडून येतात, पक्षाचा (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) एकही आमदार निवडून येत नाही. यावरून कोणाची किती ताकद आहे, याचे अनुमान काढा, असा टोला लगावून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना आरसा दाखवला आहे.

मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच ताकद मुंबईत आहेत. इतर पक्षांची ताकद मुंबईत नाही, असा दावा राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला होता. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना गोरे यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची ताकद किती हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, अमेरिकेने लावलेला टेरिफचा विषय हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबाबत केंद्र सरकारशी बोलतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही लवकरच त्यावर तोडगा काढतील आणि कालांतराने बदलेली परिस्थिती दिसून येईल.

ज्या तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे, त्या तालुक्यांची जिल्हाधिकारी माहिती घेत आहेत. पंचनामे सुरू आहेत. आवश्यकता भासल्यास नुकसानग्रस्त भागाची मी स्वतः जाऊन पाहणी करेन. सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, याही परिस्थिती सरकार शेतकऱ्यांना मदत करेल, अशी ग्वाही पालकमंत्री गोरे यांनी दिली.

गोरे म्हणाले, सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवेबाबत व्हायबिलिटी गॅप फंडिंग निर्णय आता झालेला आहे. त्यामुळे पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी सोलापूरहून विमानसेवा सुरू होईल. इतिवृत्त फायनल होण्याआधीच आपण सोमवारी त्याचे परिपत्रक काढणार आहोत. तो लगेच दिल्लीला पाठवण्यात येईल. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे त्यावर तातडीने कार्यवाही करत आहेत. सर्वकाही सुरळीत पार पडलं, तर आपल्याला अपेक्षित असलेल्या दिवशी ही विमानसेवा सुरू होईल.

मी सोलापूर जिल्ह्यात नवीन आहे. पण एखाद्या हुतात्म्याचं नाव राहणं, चुकीचं आहे. मला जी नावं माहिती होती, ती मी घेतली. त्याव्यतिरिक्त सर्वच हुतात्म्यांना अभिवादन केले आहे आणि त्यांच्याप्रती संवदेनाही व्यक्त केल्या आहेत, असेही त्यांनी कुर्बान हुसेन यांचे नाव घेण्याचे राहून गेल्याबाबत स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नांतून गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे येत्या रविवारी सोलापुरात येत आहेत. यापेक्षा वेगळे काही कार्यक्रम नाहीत. त्यानंतर कोल्हापूर येथे खंडपीठाचे उदघाटन करण्यासाठी जाणार आहेत.

फडणवीस असे निमंत्रण स्वीकारत नाहीत

स्वातंत्र्यदिनी मांसाहारी दुकाने बंद ठेवण्यचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. त्यामुळे त्याबाबत काँग्रेस नेत्यांना त्याबाबत विचारलं पाहिजे. इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारण्याआधी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना विचारलं पाहिजे. त्यांना मटणपार्टीबाबत निमंत्रण दिलं पाहिजे. फडणवीस हे आशा निमंत्रणाचा स्वीकार करत नाहीत, असेही गोरेंनी जलील यांना सुनावले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

4 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

8 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

9 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago