कारेगाव (तेजस फडके) बाभुळसर खुर्द (ता. शिरुर) येथील अष्टविनायक महामार्गालगत गोरक्ष सावळेराम डाळिंबकर यांच्या पडीक शेतात २० जुलै २०२५ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास अंदाजे ४० ते ४५ वर्षे वय असलेल्या एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळुन आला होता.
येथील शेतकरी शंकर आनंदा डाळिंबकर हे आपल्या जनावरांना चारण्यासाठी शेतामध्ये गेले असताना, त्यांना शेतात एक विचित्र वास जाणवला. त्यामुळे त्यांनी शोध घेत असताना, शेतातील आरामासाठी उभारलेल्या थर्माकॉलच्या झोपडीत त्यांना एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला पोलिस पाटील जालिंदर सातपुते यांनी माहिती कळवली होती.
रांजणगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, अंदाजे ४० ते ४५ वर्षे वय असलेल्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. मृत व्यक्तीचा रंग सावळा, उंची १६६ सेमी, अंगात विटकरी रंगाचा गोल गळ्याचा लांब बाह्यांचा दुमडलेला टी-शर्ट व काळ्या रंगाची फुल पँट होती. केस काळे व बांधा मजबूत होता.
सदर घटनेबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन, पोलीस तपास सुरु आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे सदर मृत व्यक्ती विषयी कोणालाही काही माहिती असल्यास रांजणगाव MIDC पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शिरुर तालुक्यात ‘या’ गावात आढळला अज्ञात मृतदेह
शिरुर तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्ष व अपंग क्रांती संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन
शिरुर तालुक्यातील पेट्रोल पंपात चोरी; चार कामगारांवर गुन्हा दाखल
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…