शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील एस टी स्थानकात एस टी मध्ये बसणाऱ्या महिलेचे साडेदात लाखांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिरुर येथील बस स्थानकातून श्रीगोंदा मध्ये जाण्यासाठी सुप्रिया रायकर हा आलेल्या असताना त्यांनी त्यांच्या जवळील सुमारे सात लाख पन्नास हजार रुपयांचे दागिने एका पिशवीमध्ये ठेवून पिशवी त्यांच्या दुसऱ्या बॅगमध्ये ठेवली होती. काही वेळाने एस टी मध्ये बसल्यानंतर बॅग उघडी झाल्याचे त्यामुळे त्यांनी बॅगमध्ये ठेवलेली दागिन्यांची पिशवी पाहिली असता साडे सात रुपये किमतीच्या दागिन्यांची पिशवी गायब झाल्याचे दिसून आली.
याबाबत सुप्रिया जितेंद्र रायकर (वय ३०) रा. दाभाडे वस्ती चऱ्होली पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोरे हे करत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…