क्राईम

शिक्रापूर परिसरात जनावरे चोरणारे तिघे २४ तासात जेरबंद

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथील परिसरात वारंवार जनावरे चोरीला जाण्याच्या घटना घडत असताना नुकत्याच चोरीला गेलेल्या गायांसह जनावरे चोरणाऱ्या तिघांना २४ तासात जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून संजय उर्फ संज्या भाऊसाहेब वाघमारे, अमीर साहेबराव घाडगे व दर्शन भीमराव धोत्रे असे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.

hotel matoshree ranjangaon ganpati

पाबळ (ता. शिरुर) येथील बेन वस्ती परिसरातील नवनाथ चौधरी यांच्या गोठ्यातील २ गाय नुकत्याच चोरीला गेल्या होत्या. सदर जनावरे चोरणाऱ्या आरोपींचा शोध शिक्रापूर पोलीस घेत असताना पोलीस जनावरांच्या बाजारांत माहिती घेत होते असताना सदर जनावरे काष्टी बाजारामध्ये विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस नाईक गणेश सुतार यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर, अनिल ढेकणे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, गणेश सुतार, पोलीस शिपाई विशाल देशमुख, राहुल वाघमोडे यांनी काष्टी बाजारामध्ये जाऊन सापळा लावला असता त्यांना पाबळ येथून चोरीला गेलेल्या २ गाय विक्रीसाठी आलेले दोघे दिसून आले.

दरम्यान पोलिसांच्या पथकाने संजय उर्फ संज्या भाऊसाहेब वाघमारे (वय २२), अमीर साहेबराव घाडगे (वय २१) व दर्शन भीमराव धोत्रे (वय २१) तिघे रा. लाडबा वस्ती केसनंद ता. हवेली जि. पुणे यांना चोरीच्या जनावरांसह ताब्यात घेतले त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी केंदूर येथून सुद्धा ३ शेळ्या चोरल्या असल्याची कबुली दिली तिघांना देखील पोलिसांनी अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सुतार हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

22 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

22 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

22 तास ago