शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील किनारा हॉटेलच्या आडोशाला सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत कारवाई करुन मटक्याचे साहित्य जप्त करत सोमनाथ नारायण सोनवणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
करंदी (ता. शिरुर) येथील किनारा हॉटेलच्या आडोशाला एक व्यक्ती कल्याण मटका नावाचा मटका चालवून नागरिकांना कागदावर आकडे लिहून देत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळाली त्यांनतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस नाईक रोहिदास पारखे, किशोर शिवणकर यांसह आदींनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता एक व्यक्ती नागरिकांना कागदावर आकडे लिहून देऊन त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलिसांनी सदर व्यक्तीला जागेवरच पकडून त्याच्या जवळील काही रक्कम तसेच मटक्याचे साहित्य जप्त केले.
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रोहिदास दौलत पारखे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सोमनाथ नारायण सोनवणे (वय ३०) रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे हे करत आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …