क्राईम

झाडांची छाटणी ठरली जीवावर बेतणारी! आडव्या दोरीने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

पुणे: कर्वेनगर परिसरात बुधवारी दुपारी झाडांच्या फांद्या तोडण्याच्या कामादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात घडला. रस्त्यावर आडवी बांधलेली दोरी न दिसल्याने दुचाकीस्वाराच्या गळ्याला ती अडकून गंभीर दुखापत झाली. या घटनेत रामेश्वर अवतीकर (रा. कर्वेनगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा मित्र सुधीर लांडगे हाही जखमी झाला आहे.

ही घटना (ता. ११) दुपारी सुमारे दोनच्या सुमारास अलंकार पोलिस ठाण्याजवळील मेघराज गृहनिर्माण सोसायटीसमोर घडली. मेघराज सोसायटीत वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू होते. यासाठी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून परवानगी घेण्यात आली होती. मात्र काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेला पूर्वकल्पना देणे, सहाय्यक उद्यान अधीक्षक किंवा हॉल्टीकल्चर मिस्त्री यांच्या उपस्थितीत काम करणे तसेच रस्ता बंद करण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक होते. या नियमांचे पालन न केल्याचा आरोप सोसायटी व ठेकेदारावर होत आहे.

दुपारी रामेश्वर आणि सुधीर हे दुचाकीवरून मेघराज सोसायटीसमोरील रस्त्याने जात असताना त्यांना रस्त्यावर आडवी आलेली दोरी दिसली नाही. वेगात असलेल्या दुचाकीस्वार रामेश्वर यांच्या गळ्याला दोरी अडकली आणि घर्षणामुळे त्यांच्या गळ्याला गंभीर जखम झाली. दोघेही दुचाकीसह खाली पडले. रामेश्वर यांच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ दोघांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात तपासणीदरम्यान रामेश्वर यांच्या गळ्यासह अन्ननलिकेलाही गंभीर इजा झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांनी रुग्णालयात भेट देत घटनेची माहिती घेतली.

“सोसायटीला झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी दिली होती. मात्र नियमानुसार पूर्वसूचना देणे आणि पोलिसांकडून रस्ता बंद करण्याची परवानगी घेणे आवश्यक होते. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे,” असे सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांनी सांगितले.अलंकार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून निष्काळजीपणाबाबत जबाबदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

वृक्षछाटणीतील निष्काळजीपणा पुन्हा चर्चेत

शहरात दरवर्षी झाडे उन्मळून पडणे, फांद्या कोसळणे अशा घटना घडत असतात. काही ठिकाणी नागरिकांचा जीव गेला असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. धोकादायक झाडे आणि फांद्या काढताना सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असतानाही अनेकदा ठेकेदारांकडून हलगर्जीपणा केला जातो. महापालिकेकडून परवानग्या आणि देखरेख याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.या घटनेत नियमांचे पालन झाले असते, तर तरुणाचा जीव धोक्यात येण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

3 तास ago

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

16 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

16 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

16 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

16 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

22 तास ago