क्राईम

शिरुर तालुक्यात भाजप नेत्याच्या फॉर्म हाऊसवर बारा वर्षीय बालिकेवर बलात्कार

शिक्रापुर (शेरखान शेख): शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या बड्या नेत्याच्या फार्म हाऊस वर एका बारा वर्षीय बालिकेवर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली असुन शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे विशाल दामोदर गायकवाड या नराधम युवकावर गुन्हे दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या नेत्याचे फार्म हाऊस असून सदर ठिकाणी काही कुटुंबीय कामाला आहे. पिडित युवतीचे आई वडील हे सदर नेत्याच्या फार्म हाऊस वर कामाला असून मुलीचे आई वडील दोघेही बाहेर गेलेले असताना त्याच ठिकाणी असलेल्या विशाल गायकवाड या युवकाने पिडीतेला बळजबरीने पकडून घरामागील बाजूस घेऊन जात तिला जीवे मारण्याची धमकी देत तिचे तोंड दाबून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. यावेळी विशाल गायकवाड याने बारा वर्षीय मुलीला ‘तू आत्ता घडलेला प्रकारबाबत कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई वडिलांना खल्लास करुन टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे मुलगी पूर्णतः भेदरली त्यांनतर भेदरलेल्या मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला तेव्हा मुलीचे वडील घरी नसल्याने मुलीची आई देखील घाबरून गेली. त्यानंतर मुलीचे वडील घरी आल्यानंतर मुलीच्या आईने व मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगितला.

त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले, घडलेला प्रकार पोलिसांना सांगत पीडित बालिकेच्या आईने याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विशाल दामोदर गायकवाड (वय २१) सध्या रा. भाजप नेता फार्म हाऊस ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. हळणी ता. अहमदपूर जि. लातूर याचे विरुद्ध बाललैंगिक अत्याचार सह बलात्काराचे गुन्हे दाखल करत त्याला तातडीने अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

11 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

14 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

16 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago