क्राईम

शिरूर तालुक्यातून एकाला पाठलाग करून पकडले; वाहनांसह मोबाईल जप्त…

पुणेः सराईत गुन्हेगाराकडून आठ वाहने व जबरी चोरीतील 2 मोबाईल तसेच 2 गुन्ह्यात पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास पाठलाग करून गुन्हे शाखा, युनिट 2 ने जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस आयुक्त पुणे शहर यांनी दिलेल्या आदेशान्वये वाहन चोरीच्या अनुषंगाने युनिट – 2 चे स्टाफ पेट्रोलींग करीत होते. युनिट -२ कडील पोलिस अंमलदार समीर पटेल व कादीर शेख यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पुण्यामध्ये येऊन वाहने चोरणारा शिक्रापूर येथील चव्हाण कॉम्पलेक्सचे बाजूला भुजबळ चाळ येथे भगवान मुंडे नावाचा एक व्यक्ती रहात असून त्याच्या जवळ वेग – वेगळ्या कंपनीच्या दुचाकी गाड्या आहेत. सदर गाड्या संशयास्पद असल्याची खात्रीशीर खबर मिळाली. सदरची खबर युनिट -२ प्रभारी क्रांतीकुमार पाटील यांना कळविली असता त्यांनी सदर बाबत खात्री करुन, कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. शिक्रापबर येथे तपासकामी बातमीचे ठिकाणी जावून गुप्त पणे पाहणी केली असता, बातमीप्रमाणे एक व्यक्ती संशयास्पद रित्या अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम एच १२ पी ई ६४९४ हिचेवर बसलेला दिसला.

बातमीप्रमाणे खात्री होताच आम्ही वरील स्टाफचे मदतीने सदर व्यक्तीस ताब्यात घेतले. भगवान राजाराम मुंडे (वय ३२ धंदा सिक्युरेटी व्यवसाय रा. परभणी सध्या रा. भुजबळ चाळ चव्हाण कॉम्पलेक्स शेजारी शिक्रापूर) असे त्याचे नाव आहे. त्यास विश्वासात घेवून त्याचे ताब्यातील अॅक्टीव्हा गाडीबाबत विचारपूस केली असता, त्याने अॅक्टीव्हा गाडी कमान हॉस्पीटल, वानवडी पुणे येथून सुमारे १५/२० दिवसापुर्वी गाडी चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर सदर गाडीची डिक्की उडघून पाहता त्याचे डिक्कीमध्ये वेग – वेगळ्या कंपनीचे दोन मोबाईल फोन मिळून आले सदर अॅक्टीव्हा तसेच मोबाईल फोन चोरी करुन आणले असल्याची दाट शक्यता वाटत असल्याने अधिक तपास केले असता आरोपीकडे 8 दुचाकी, 2 मोबाईल असा एकूण २,८२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुददेमाला बाबत खात्री करण्यात आलेली असून, त्याबाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

१ ) वानवडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि क्रमांक २३३/२०२२ भा व वि कलम ३७ ९ अन्वये ऍक्टिवा दुचाकी गुन्हा उघडकिस आणला आहे
2) लष्कर पोलिस स्टेशल गुन्हा रजि क्रमांक ५ ९ / २०२२ भा व वि कलम ३७ ९ अन्वये पॅशन प्रो दुचाकी गुन्हा उघडकिस आणला आहे.
३ ) पुणे रेल्वे पोलिस स्टेशन रेल्वे पोलिस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक १५१ / २०२२ भा व वि कलम ३ ९ २ मध्ये पाहिजे आरोपी आहे
४ ) नादेड रेल्वे पोलिस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ५५५/२०२१ भा द वि कलम ३९२ मध्ये पाहिजे आरोपी आहे
तपासात निष्पन्न झालेले व सदर आरोपी याचेकडुन जप्त करण्यात आलेले 8 मोटार सायकल व 2 मोबाईल फोन बाबत मुळ मालकांचा शोध घेत आहोत नमुद आरोपीस वानवडी पोलिस स्टेशन गु.र.नं. २३३ / २०२२ भा .द.वि. कलम ३७ ९ अन्वये वैदयकीय तपासणी करुन ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे टॉम्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. क्रांतीकुमार पाटील, सपोनि वैशाली भोसले, विशाल मोहिते पो.उप.निरी. नितीन कांबळे, राजेंद्र पाटोळे, पोलिस अंमलदार, शंकर नेवसे, समीर पटेल, कादिर शेख, गणेश थोरात, गजानन सोनुने, संजय जाधव, विनोद चव्हाण, निखिल जाधव, साधना ताम्हाणे यांनी केली आहे.

unique international school
शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात डीपी चोरीच्या घटना; संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात…

शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त…

17 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात प्रियकराने केली चिमुकल्याची हत्या; लिव्ह इन मुळे लाईफ धोक्यात…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, एका तीन…

24 मिनिटे ago

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

5 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

5 तास ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

5 तास ago

ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी "ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?" या शीर्षकाची एक व्यंगात्मक…

9 तास ago