क्राईम

वाघोलीमध्ये अल्पवयीन मुलीचा बापाने केला खून…

पुणे: वाघोलीमध्ये अल्पवयीन मुलीचा बापाने कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीचा खून केल्यानंतर बाप पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून बापाने मुलीचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अक्षता फकिरा दुपारगुडे (वय १५, सध्या रा. वाघोली, मूळ रा. सोलापूर) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. अक्षता हिच्या काकाने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अक्षता हिचा बाप बांधकाम मजूर असून, आई गृहिणी आहे. मृत मुलगी वाघोलीतील एका शाळेत शिकत होती. अक्षताची आई घरकामासाठी सकाळी बाहेर पडली. त्यावेळी बापाने अक्षता हिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात बापाने कुऱ्हाडीने मुलीवर वार केले. या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक आणि रहिवाशांनी तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. मुलीचा खून करून बाप पसार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. लोणीकंद पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

वाघोलीत समलैंगिक संबंधातून कोयत्याने वार करून युवकाची हत्या…

वाघोलीतील लॉजवर प्रेमीयुगुलाची गळफास घेत आत्महत्या…

वाघोलीत गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना युवकाचा मृत्यू…

वाघोलीत गर्भवती महिलेच्या पोटात मारली लाथ अन्…

वाघोलीत प्रेमप्रकरणातून प्रेयसीने केली प्रियकराची हत्या…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

10 तास ago

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या…

21 तास ago

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिरुर (तेजस फडके) अजित पवार हे फार मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे.…

22 तास ago

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा…

2 दिवस ago

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक…

2 दिवस ago

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

4 दिवस ago