शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत शिरुर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ‘महाराजा लॉज’ आणि ‘साई श्रेयांस लॉज’ येथील वेश्या व्यवसायावर शिरुर पोलिसांनी 12 मार्च 2024 रोजी कारवाई केली होती. तसेच याबाबत पोलिस हवालदार नितीन पोपटराव सुद्रिक यांच्या फिर्यादीवरुन अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तीन जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. परंतु हे लॉज वेश्याव्यवसायासाठी भाड्याने देणाऱ्या लॉजच्या मालकांवर कारवाई कधी होणार अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या पथकातील दर्शन दुगड (I.P.S) यांनी साध्या वेशामध्ये पुणे-नगर महामार्गावरील हॉटेल तसेच लॉजेस मध्ये चालणा-या अवैध धंद्यांबाबत माहिती काढत असतांना दि 22 फेब्रुवारी 2024 रोजी कारेगाव (ता. शिरुर) येथील यश-इन चौकात तीन मजली इमारतीमधील खोलीमध्ये वेश्या व्यवसाय चालु असल्याचे निदर्शनास आल्याने रांजणगाव MIDC पोलिसांनी त्या वेश्या व्यवसायावर कारवाई करत बिल्डिंग मालकावर गुन्हा दाखल केला होता.
त्याचप्रमाणे शिरुर येथील ‘महाराजा लॉज’ आणि ‘साई श्रेयांस लॉज’ या दोन्ही लॉजवर शिरुर पोलिसांनी 12 मार्च 2024 रोजी कारवाई करत दिपक शंकरलाल उपाध्याय (रा. सुशीला पार्क,शिरुर) विमल बागवान टेलोत (वय 42) (रा. पिंडवाल ता. आसपुर जि. डोंगरपुर, राजस्थान) सध्या रा. महाराज लॉज,शिरुर ता. शिरुर, जि. पुणे आणि अशोक गंगाधर उबाळे (वय 50) रा. साई श्रेयांस लॉज, शिरुर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु वेश्याव्यवसाय चालविण्यासाठी लॉज भाड्याने देणाऱ्या लॉज मालकांवर शिरुर पोलिस गुन्हा दाखल करणार का…? अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा चालु आहे.
शिरुरचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांना याबाबत विचारलेअसता त्यांनी सांगितले की, शिरुर येथील वेश्या व्यवसाया संदर्भात तीन जणांवर गुन्हे दाखल केले असुन अजुनही काही आरोपीना अटक करणे बाकी आहे. तसेच लॉज मालकांनी जो भाडेकरार केलेला आहे. त्यात काय काय नियम आणि अटी आहेत. ते सविस्तर पाहुन पुढील तपासात कारवाई बाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…