शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे घरगुती वादातून महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत महिलेला काठीने करुन जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अजीज बाबूलाल इनामदार याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पाबळ (ता. शिरुर) शबाना इनामदार या महिलेचा पती अजीज इनामदार वारंवार पत्नीला घरगुती वादातून मारहाण करत असे दोन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अजीज याने अचानक पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर महिलेने तिच्या आई वडिलांना फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर महिलेचे आई वडील आले असता अजीज याने त्यांना देखील शिवीगाळ करत दमदाटी केली.
याबाबत शबाना अजीज इनामदार (वय ४०) रा. पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अजीज बाबूलाल इनामदार रा. पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश सुतार हे करत आहे.
थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…
केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…
मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…