क्राईम

प्रेमप्रकरणातून महिला शेतकरी नेत्या आंचल मिश्रा यांची हत्या; आरोपी अटकेत

श्रावस्ती (उत्तर प्रदेश): प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून महिला शेतकरी नेत्या आंचल मिश्रा (35) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरज वर्मा या आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंचल मिश्रा या किसान युनियनच्या सभेला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याने त्यांच्या पती संतोष मिश्रा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांच्या चौकशीत आरोपी सुरज वर्मा याने सांगितले की, गेल्या तीन-चार महिन्यांपासून त्याचे आणि आंचल मिश्रा यांचे प्रेमसंबंध होते. आंचल त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती आणि पैसे न दिल्यास पोलिसात तक्रार करण्याची धमकी देत असल्याचा दावा त्याने केला. या भीतीमुळे आणि वादातून त्याने 17 फेब्रुवारी रोजी आंचल यांना जंगलात नेऊन गळा दाबून हत्या केली.

हत्या केल्यानंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आंचलच्या पतीसोबत तिला शोधण्याचे नाटकही केले. मात्र पोलिसांनी मोबाइल लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास केला असता त्याचा खोटेपणा उघड झाला.

आरोपीच्या कबुलीजबाबानुसार पोलिसांनी 3 मार्च रोजी ककरदरी जंगलातून आंचल मिश्रा यांचा मृतदेह आणि जळालेले कपडे जप्त केले. घटनास्थळावर मिळालेल्या कपड्यांच्या आधारे पती संतोष मिश्रा यांनी ओळख पटवली.

भिनगा क्षेत्राचे क्षेत्राधिकारी सतीश कुमार शर्मा यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून आरोपी सुरज वर्मा याच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

5 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago