क्राईम

इलेक्ट्रिक बस कारवर आदळल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा चिरडून अंत

मुंबई: बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडक दिल्यामुळे पादचारी महिलेचा चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या समोर सकाळच्या वेळेस हा अपघात झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कसा झाला अपघात

दक्षिण मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या समोरुन जात असताना बेस्ट इलेक्ट्रिक बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला बसने मागच्या बाजूने धडक दिली.

यावेळी कार आणि बस यांच्या मधोमध असलेली महिला चिरडली गेली. तिच्या शरीराच्या खालील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले.

संबंधित महिला मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली होती. मात्र तिच्यावर काळाने घाला घातला. महिलेला अपघातानंतर रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.

खेडमध्ये महिला भाविकांनना अपघात

तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने खेड तालुक्यातील कुंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांच्या पिकअप वाहनाला भीषण अपघात झाला. भाविकांना घेऊन घाटातून जाणारी गाडी तब्बल 80 फूट खोल दरीत कोसळल्याने दहा महिलांचा मृत्यू झाला, तर 25 ते 30 जणी जखमी झाल्या आहेत.

खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेल्या शिव कुंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी पापळवाडी येथील काही महिला पीकअप जीपने जात होत्या. घाटातून प्रवास करताना त्यांची गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात नऊ महिलांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात घेऊन जाताना आणखी एका महिलेने प्राण सोडले. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक पंचवीस वर्षीय तरुण ठार झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास सिल्लोड- भोकरदन रस्त्यावरील वरुड पिंप्री फाट्यावर घडला. पंकज उर्फ पोपट कौतिक शिरसाट (२६, रा. पिंप्री) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

2 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

16 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

22 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

23 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

23 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

23 तास ago