देश

कर्तव्यावर असतानाच वीरमरण! डोडात लष्करी वाहनाचा भीषण अपघात;10 जवान शहीद, 7 जखमी

डोडा: जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील भदेरवाह भागात लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खानी टॉप परिसरात भारतीय लष्कराचे एक बुलेटप्रूफ वाहन अनियंत्रित होऊन सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत 10 जवान शहीद झाले असून 7 जवान गंभीर जखमी झाले आहेत.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन 17 जवानांना घेऊन उंच भागातील एका लष्करी पोस्टकडे जात होते. दुर्गम आणि अरुंद रस्त्यावरून प्रवास करत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि क्षणात हे वाहन दरीत कोसळले. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनातील जवानांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही.

घटनेची माहिती मिळताच लष्कराचे बचाव पथक, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, डोंगराळ भूप्रदेश, अरुंद रस्ते आणि प्रतिकूल हवामानामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी आल्या. तरीही जवानांनी आणि प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव कार्य राबवत जखमी जवानांना दरीतून बाहेर काढले.

या अपघातात जखमी झालेल्या 7 जवानांपैकी 4 जवानांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने एअरलिफ्ट करून उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित जखमी जवानांवरही उपचार सुरू आहेत.

लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, बुलेटप्रूफ वाहनाचे वजन अधिक असल्याने अपघाताची तीव्रता वाढली. तसेच या भागातील रस्ते अत्यंत वळणावळणाचे असून धुके व निसरडे रस्ते अपघातास कारणीभूत ठरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेनंतर संपूर्ण भारतीय लष्करात शोककळा पसरली असून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. लष्कराने या अपघाताच्या कारणांचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर जवानांना संपूर्ण देश श्रद्धांजली अर्पण करत आहे.

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

11 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

11 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

12 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

17 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

17 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

17 तास ago