मुख्य बातम्या

शिरूर ड्रग्ज प्रकरण! पोलिस हवालदार गुजर व शिंदे बंधूंचे काळ्या धंद्याचे जाळे होणार उघड…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला पोलिस हवालदार श्यामसुंदर गुजर आणि आरोपी प्रकरणात ड्रग्सचा माल पुरवणारा माऊली शिंदे (रा. कोहकडी, ता. पारनेर) यांच्यातील संबंध केवळ अंमली पदार्थांपुरते मर्यादित नसून, मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या अनेक काळ्या धंद्यांपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून समोर येत आहे.

विशेष म्हणजे या बेकायदेशीर व्यवहारात आरोपी शिंदे याचा भाऊही सक्रियपणे सामील असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, तपासाची व्याप्ती आता अधिक व्यापक करण्याची आवशक्यता निर्माण झाली आहे. शिंदे हा जाणीवपूर्वक भावाला गुन्हा गुन्हातून लपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा भाऊ अनेक ड्रग्स विक्रेत्यांच्या संपर्कात असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार गुजर हा गेल्या वर्षभरापासून शिंदे यांच्या सतत संपर्कात होता. या काळात ड्रग्जची वाहतूक, गुटखा निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची तस्करी, तसेच हायवेवर मालाची लूट करून त्याची परराज्यात विक्री अशा विविध बेकायदेशीर कारवाया केल्या जात होत्या. विशेष म्हणजे, गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी लाल सुपारी ही नगरमार्गे गुजरातकडे पाठवली जात असल्याचेही तपासात पुढे येत आहे.
या संपूर्ण नेटवर्कमध्ये पोलिस हवालदार गुजर याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. पोलिस यंत्रणेतील पदाचा गैरवापर करत गुजरकडून हायवेवरील हालचालींची माहिती, तपास यंत्रणांचे वेळापत्रक आणि तपास टाळण्यासाठी आवश्यक ‘संरक्षण’ दिले जात होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. गुजरच्या मदतीनेच शिंदे बंधू हायवेवर जाणाऱ्या मालवाहू वाहनांची लूट करत आणि हा माल थेट कर्नाटक राज्यात नेऊन विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याबाबतीतही तपास करण्याची मागणी आता पुढे येत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, ड्रग्ज प्रकरणात शिंदे याला अटक झाल्यानंतरही त्याचा भाऊ पोलिस स्टेशनला भावाला भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेला नाही. शिंदे याचा भाऊ सध्या कर्नाटक राज्यात पळून गेल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडे असून, त्यामुळे त्याच्यावर संशय अधिक बळावला आहे. तपास यंत्रणांनी या हालचालींची गंभीर दखल घेण्याची गरज असून, संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्याची मागणी होत आहे.

ड्रग्जसह इतर अनेक काळ्या धंद्यांमध्ये शिंदे आणि त्याचा भाऊ दोघेही सहभागी असल्याचे पुरावे मिळत आहेत. आतापर्यंत कोट्यावधींचे कोणा कोणाला हे ड्रग्स विकले त्यांनाही यात आरोपी करणे महत्त्वाचे आहे. शिंदे याच्या भावालाही तातडीने ताब्यात घेऊन सखोल चौकशी करणे अत्यावश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिस खात्यात मोठी खळबळ उडाली असून, एका पोलिस कर्मचाऱ्याचा थेट गुन्हेगारी नेटवर्कमध्ये सहभाग उघड झाल्याने पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणाचा कसून तपास करण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता असून, पुढील तपासात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, तपास यंत्रणा सर्व बाबींची पडताळणी करत असून, दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे संकेत अधिकृत सूत्रांनी दिले आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात या ड्रग्जची विक्री होत होती व तरुणाई बिघडत चाललेली होती.त्यामुळे कठोर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गाकडून होत आहे. या प्रकरणात अजून बऱ्याच आरोपींची संख्या वाढणार असून शिरूर पोलिस आता निरपेक्ष कारवाई करून किती जणांना यामध्ये गजाआड करतात हेही पाहणे महत्वाचे आहे. गुजरला अजून किती पोलिस अधिकाऱ्यांची साथ होती याचाही तपास करण्याची मागणी पुढे येत आहे.प्रकरण केवळ ड्रग्जपुरते न राहता, राज्यांतर्गत आणि आंतरराज्य काळ्या धंद्यांच्या मोठ्या साखळीपर्यंत पोहोचणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये शिरूर तालुका. कॉम बारकाईने लक्ष ठेवून असून गुजर व शिंदे बंधूंच्या काळ्या धंद्यांचा पर्दाफाश करणार आहे.
(क्रमशः)

ड्रग्ज रॅकेटमध्ये नगरचा पोलीसच मुख्य सूत्रधार

शिरूरमध्ये एमडी ड्रग्जविरोधात धडक कारवाई; कोट्यावधींच्या मुद्देमालासाह आरोपीला अटक…

मोठी बातमी! शिरुर तालुक्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; १७४ किलो ड्रग्ज जप्त

शिरूरमध्ये तब्बल २० कोटींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘आतील माणूस’ निघाला पोलिसच…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

8 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

8 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

12 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

17 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 दिवस ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 दिवस ago