देश

सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या…

नेपाळ: देशात वाढलेला भ्रष्टाचार आणि सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीविरोधात नेपाळमधील तरुणाईचा उद्रेक झाला होता. तरुणांच्या Gen-Z ने केलेल्या या देशव्यापी आंदोलनामुळे नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

त्यानंतर आता नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून, देशाच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी या सरकारचं प्रमुखपद सांभाळण्यास होकार दिला आहे. तसेच नेपाळचा शेजारील देश असलेला भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही आपली भूमिका स्पष्ट करणारं मोठं विधान केलं आहे.

सुशीला कार्की म्हणाल्या की, मी नरेंद्र मोदी यांना प्रणाम करते. माझ्यावर नरेंद्र मोदी यांचा चांगला प्रभाव आहे. मी नेपाळचं नेतृ्त्व करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. मी कमी काळासाठी का असेना देशाचं नेतृत्व करावं, यासाठी नेपाळमधील आंदोलनात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या Gen-Z गटाने माझ्यावर विश्वास दर्शवला आहे, असेही कार्की यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, या आंदोलनामध्ये ज्यांनी प्राण गमावले, अशा लोकांचा सन्मान करण्यास मी प्राधान्य देणार आहे. आंदोलनादरम्यान, मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांसाठी काही तरणी करणं हे आमचं पहिलं काम असणार आहे.

यावेळी नेपाळला पाठिंबा देण्याबाबतच्या भारताच्या भूमिकेबाबत कार्की म्हणाल्या की, मी भारताचा खूप सन्मान करते. तसेच माझं भारतावर प्रेम आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीमुळे प्रभावित झाले आहे. भारताने नेपाळला खूप मदत केलेली आहे.

दरम्यान, नेपाळमधील अस्थिर राजकीय इतिहासाचा उल्लेख करत कार्की यांनी सांगितले की, नेपाळमध्ये सुरुवातीपासूनच काही अडचणी राहिलेल्या आहेत. सध्या परिस्थिती कठीण आहे. आम्ही नेपाळच्या विकासासाठी काम करू. आम्ही देशाची नव्याने सुरुवात करू, असेही त्या म्हणाल्या. सुशीला कार्की ह्या नेपाळच्या पहिल्या महिसा सरन्यायाधीश आहेत. त्यांनी २०१६ मध्ये हे पद सांभाळले होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

12 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago