देश

Video: हा माणूस जुगाडचा बाप ठरला….

नवी दिल्लीः एका युवक मोटार लावून पलंगाद्वारे चारचाकीमध्ये रुपांतर केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओ पाहून ‘हा माणूस जुगाडचा बाप ठरला,’ अशा प्रतिक्रिया नेटिझन्सने मांडल्या आहेत.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक युवक आपली चारचाकी गाडी घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचतो, ज्यामुळे पंप कर्मचारीही हैराण होतात. ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे ते याला एक आश्चर्यकारक इनोव्हेशन म्हणत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा जुगाड गावातील लोकांसाठी वरदान ठरू शकतो, असा त्यांचा विश्वास आहे. मात्र, त्याचा उद्योगपती महिंद्रांवर तितकासा प्रभाव पडला नाही.

उद्योगपती महिंद्र यांनी हा व्हिडिओ ट्विट करत लिहिले आहे की, ‘हा एक प्रॅंक जुगाड सारखा दिसत आहे. याशिवाय यामुळे नियमांचेही उल्लंघन होते. मात्र, दुर्गम भागातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे जीवदान ठरू शकते.’ एका युजरने लिहिले आहे की, सुरक्षाही महत्त्वाची आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ‘हा माणूस जुगाडचा बाप ठरला.’

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago