मनोरंजन

कार्तिक आणि दीपा यांचं पुन्हा बहरणार नात…

मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिका गेल्या बऱ्याच दिवसांपासून TRP च्या शर्यतीत अग्रेसर आहे. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. कार्तिक आणि दीपा पुन्हा एकत्र येणार असून त्यांचे नाते बहरताना दिसणार आहे.

या मालिकेत दीपिका आणि कार्तिकीला दीपा, कार्तिक आई वडील म्हणून हवे आहेत. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी ते सध्या प्रयत्न करत आहेत. यात त्यांना सौंदर्या देखील मदत करते आहे. नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात, सौंदर्या दीपाला घरी बोलवते. तुझी वस्तू द्यायची आहे, असे सांगते. सौंदर्या दीपाला त्यांच्या लग्नाचा अल्बम देते. तो अल्बम दीपा घरी घेऊन येते आणि कार्तिकीच्या हाती लागू नये म्हणून कपाटात ठेवून देते. तर दुसरीकडे कार्तिक आयशाचे ऐकून दीपिकाला खोटे सांगतो. दुसऱ्याच कोणाचा तरी फोटो दाखवून ही तुझी आई आहे, असे सांगतो. तिचे तुझ्या जन्माच्या वेळी निधन झाले. हे ऐकून दीपिकाला खूप वाईट वाटते.

दरम्यान आता मालिकेचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यात पाहायला मिळत आहे की, दिपा आणि कार्तिक मेडिकल कॅम्पमध्ये रुग्णांची सेवा करत आहेत. त्यावेळी दीपा नर्स म्हणून काम करताना दिसत आहे आणि कार्तिकला मदत करताना दिसते आहे. तिथे काम करत असताना त्यांना त्यांच्या लग्नाआधीच्या दिवसांच्या आठवणी ताज्या होणार आहेत. लग्नाआधी ते दोघे एका मेडिकल कॅम्पमध्ये जातात. तिथेच त्यांची चांगली मैत्री झाली होती आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले होते. या मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने पुन्हा दीपा आणि कार्तिक यांचे नाते बहरेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

4 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

4 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

4 तास ago

दीड महिन्यापूर्वीच लग्न; भीमाशंकर दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…

4 तास ago

शिक्षक दिनी मलठण सोसायटीकडून गुरुजनांचा गौरव

शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…

4 तास ago

दहीहंडीचा थरार ठरला जीवघेणा! मुंबई-नवी मुंबईत दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू; १६८ गोविंदा जखमी

मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…

5 तास ago