मनोरंजन

आमिर खान करणार आता भोजपुरी चित्रपटात काम

मुंबई: चार वर्षांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आता ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटातून पुन्हा एकदा कमबॅक करतो आहे.

नुकताच आमीर खान हा साऊथच्या चित्रपट वल्लींना भेटून आला आणि यानिमित्ताने त्याने रजनीकांत, चिरंजीवी आणि राजमौली यांना त्यांनी ‘लाल सिंग चढ्ढा’चे स्पेशल स्क्रिनिंगही दाखवले. आमिर खान आणि भोजपुरी सुपरस्टार गायिका आणि अभिनेत्री अक्षरा सिंग सध्या खूप चर्चेत आहेत. सध्या यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे आता तो ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

असा म्हटला भोजपुरी डायलॉग…
मुलाखतीच्या दरम्यान अक्षराने आमीर खानकडून एक भोजपूरी डायलॉग बोलवून घेतला त्यात आमीर खान म्हणाला… ”फटी तो फटी लेकिन पावर ना घटी…”

ऑक्सिजन कमी असलेल्या ठिकाणी केले शुटिंग…
‘लाल सिंग चड्ढा’चे अनेक ठिकाणी शूटिंग झाल्याचे आम्ही ऐकले आहे. शुटींग दरम्यान असे काही किस्से किंवा अशी कोणती घटना तुमच्या लक्षात आहे का? या प्रश्नाच्या उत्तर देताना आमिरने सांगितले की, हा चित्रपट करताना खूप शारीरिक आव्हाने माझ्यासमोर होती. आमिरने सांगितले की जेव्हा तो कारगिलला शूटिंग करत होता तेव्हा कठीण परिस्थितीचा त्याला सामना करावा लागला.

लॉकेशनच्या ठिकाणी रस्ता नव्हता मग तिथे रस्ता तयार करण्यात आला. रस्ता तयार झाल्यानंतर संपूर्ण युनिट तिथे पोहोचले आणि महिनाभर तरी तिथे शूटिंग सुरु होते. आम्ही इतक्या उंचीवर होतो की तिथे ऑक्सिजनही नव्हता. शूटिंग करताना खूप त्रास झाला. शूटिंगदरम्यान आमिरला 5-6 वेळा ऑक्सिजन तरी घ्यावा लागला. आमिर खानचा चित्रपट 11 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेत्री करीना कपूर पुन्हा एकदा आमिर खानसोबत दिसणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

15 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

19 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

19 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

19 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

19 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

20 तास ago