मनोरंजन

‘या’ अभिनेत्याने साकारली १४४ चित्रपटांमध्ये पोलिसांची भूमिका

मुंबई: चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत, जे विशिष्ट व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखले जातात. काही म्हाताऱ्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जातात, तर काही खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात.

१४४ चित्रपटात बनले पोलीस
आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, ते दुसरे कोणी नसून जगदीश राज आहेत. तसे, त्यांनी १९५६ मध्येच त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. १९५६ च्या ‘CID’ चित्रपटात ते पहिल्यांदा पोलिस म्हणून दिसले होते. या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारल्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आणि बहुतांश चित्रपटांमध्ये ते पोलिसाच्या भूमिकेतच दिसले. जगदीश राज यांच्याबद्दल, असे म्हटले जाते की, त्यांनी जवळपास १४४ चित्रपटांमध्ये पोलिसांची भूमिका साकारली आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव
जगदीश राज यांनी चित्रपटांमध्ये १४४ वेळा पोलिसांची भूमिका साकारल्यामुळे, ‘मोस्ट टिपिकल कास्ट ऍक्टर’ म्हणून त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

२०१३ साली घेतला जगाचा निरोप
जगदीश राज यांनी आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले होते आणि पोलिसांची भूमिका साकारुन ते प्रसिद्ध झाले होते. मात्र, २८ जुलै २०१३ रोजी त्यांचे निधन झाले आणि या जगाचा निरोप घेऊन ९ वर्षे झाली. मात्र, जगदीश राजप्रमाणेच त्यांची मुलगी देखील एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे जिचे नाव अनिता राज आहे. त्यांनी ८० आणि ९० च्या दशकातील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्य दाखवले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

16 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

20 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

20 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

20 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

20 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

21 तास ago