मनोरंजन

विराट कोहलीच्या शतकाइतकाच चर्चेत; मैदानावर प्यायलेला ‘पिकल ज्यूस’

इंदौर: इंदौरच्या होळकर स्टेडिअमवर रविवारी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत आपलं ५४वं एकदिवसीय शतक झळकावलं. या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत असतानाच, सामन्यातील एक वेगळाच क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मैदानात नेमकं काय पित होता विराट?

व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहली फलंदाजीदरम्यान अचानक थांबतो आणि एका छोट्या पॅकेटमधून काहीतरी पेय पितो. मात्र ते पेय पिताच त्याने तोंड वाकडं केल्यामुळे नेटकऱ्यांची उत्सुकता वाढली. त्यानंतर तो केळ खातो आणि पुन्हा एक घोट घेऊन ते पेय गिळताना दिसतो. यामुळे “विराट नेमकं काय पित होता?” असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

स्पोर्ट्स ड्रिंक नव्हे, तर ‘पिकल ज्यूस’!

तज्ज्ञांच्या मते, मोठ्या स्पोर्ट्स इव्हेंट्समध्ये खेळाडू ब्रेकच्या वेळी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी, गेटोरेडसारखी स्पोर्ट्स ड्रिंक्स घेतात. मात्र काही अ‍ॅथलीट्स पिकल ज्यूस देखील पितात. हा एक झिरो-कॅलरी ज्यूस असून त्याची चव आंबट-खारट असल्यामुळे तो पिताना अनेक खेळाडूंच्या चेहऱ्यावर मजेशीर प्रतिक्रिया उमटतात.

पिकल ज्यूस म्हणजे काय?

पिकल ज्यूस म्हणजे काकडीच्या लोणच्याच्या प्रक्रियेनंतर उरलेलं पाणी. हे पाणी मीठ, व्हिनेगर आणि विविध मसाल्यांनी तयार केलं जातं. मसाल्यांमध्ये Dill (शेपू), लसूण किंवा थोडी साखर असू शकते. लोणच्यातील काकड्या काढल्यानंतर उरलेलं हेच पाणी म्हणजे पिकल ज्यूस, ज्यामध्ये काही आरोग्यदायी गुणधर्म असतात.

पिकल ज्यूसचे आरोग्यदायी फायदे 

हायड्रेशनसाठी मदत

व्यायामानंतर घामामुळे शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम कमी होतात. पिकल ज्यूसमधील पाणी आणि सोडियम यामुळे हायड्रेशन टिकून राहण्यास मदत होते.

मसल क्रॅम्प्स कमी होतात

कठोर व्यायामादरम्यान येणाऱ्या मसल क्रॅम्प्सवर पिकल ज्यूस प्रभावी ठरतो. एका लहान अभ्यासानुसार, पिकल ज्यूस पिल्याने क्रॅम्प्सचा कालावधी सुमारे ४९ सेकंदांनी कमी झाला.

पचनसंस्थेसाठी फायदेशीर

फर्मेंटेड लोणच्याच्या रसातील प्रोबायोटिक्स पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना मदत करतात, ज्यामुळे गट मायक्रोबायोम सुधारतो.

रक्तातील साखर नियंत्रणात

पिकल ज्यूसमधील व्हिनेगर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास सहाय्यक ठरू शकतो.

पिकल ज्यूसचे पोषणमूल्य (१०० मिलीमध्ये)

कॅलरीज: ०

कार्बोहायड्रेट: ० ग्रॅम

फॅट: ० ग्रॅम

फायबर: ० ग्रॅम

सोडियम: ३४२ मिलीग्राम

पोटॅशियम: २९ मिलीग्राम

पिकल ज्यूसचे दुष्परिणाम

पिकल ज्यूस सर्वांसाठी योग्य नसतो. त्यातील आम्लता GERD किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना त्रासदायक ठरू शकते. तसेच, जास्त सोडियममुळे हृदयरोग किंवा किडनीचे आजार असलेल्या रुग्णांनी तो टाळावा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

किती प्रमाणात पिणं योग्य?

पोषणतज्ज्ञांच्या मते, पिकल ज्यूस मर्यादित प्रमाणातच घ्यावा. जर आहारात पिकल ज्यूसचा समावेश करत असाल, तर इतर सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन कमी करणं आवश्यक आहे.

या दिग्गज खेळाडूंनीही घेतला पिकल ज्यूस

टेनिस स्टार कार्लोस अल्काराझ याने फ्रेंच ओपनमध्ये जॅनिक सिनरविरुद्ध खेळताना पिकल ज्यूस घेतला होता. तसेच ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट कर्णधार मिशेल मार्श याचंही पिकल ज्यूस पितानाचं रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्यांनी सांगितलं की, यामुळे त्यांचे मसल क्रॅम्प्स कमी झाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

7 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

7 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

7 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

7 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

7 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

11 तास ago