राजकीय

शिरूर! जिल्हा परिषद गट टाकळी हाजीत कोणता पक्ष ठरणार श्रेष्ठ …

शिरूर (नितीन थोरात) : जिल्हा परिषद गट टाकळी हाजी येथे राजकीय घडामोडींनी अचानक वेग घेतला असून, या गटातील उमेदवारांची चिंता वाढली आहे. कालपर्यंत संभाव्य पक्षचिन्हांची छाप मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवारांकडून झालेली धडपड, नव्या राजकीय समीकरणांमुळे व्यर्थ ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टाकळीहाजी हे या गटातील सर्वाधिक मतदार असलेले गाव मानले जाते. याच गावातून जिल्हा परिषदेसाठी दोन उमेदवार इच्छुक असल्याची माहिती मिळते. दुसरी प्रमुख मतदारसंख्या असलेले गाव म्हणजे कवठे येमाई. येथूनही जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी दोन उमेदवारांनी इच्छा दर्शविली आहे. त्यामुळे गटातील स्पर्धा चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे.

टाकळी हाजी गटातील पंचायत समिती मतदारसंघासाठी नेमके किती उमेदवार इच्छुक आहेत आणि कोण असणार, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही. स्थानिक स्तरावर चर्चा सुरू असली तरी अधिकृत हालचाली चित्रात आलेल्या नाहीत. या गटात नुकतेच झालेल्या पक्षीय बदलामुळे कोणत्या पक्षाला लाभ होणार याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा आहेत. काहींच्या मते सत्ताधारी पक्षाला लाभ होण्याची शक्यता आहे, तर काहींचा अंदाज विरोधकांना फायदा होऊ शकतो असा आहे. मात्र अंतिम लाभ कोणाला मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

पक्षीय चिन्ह, स्थानिक नेतृत्त्वाचा पाठींबा, तसेच गावनिहाय जातीय व गटबाजीचे राजकारण या सर्व घटकांचा घडामोडींवर मोठा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवार गावागावांत संपर्क वाढवत असून समर्थकांची फळी मजबूत करण्याच्या प्रयत्नात व्यस्त दिसत आहेत. दरम्यान, बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कवठे येमाई-टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र गावडे यांची उमेदवारी कापून दामूआण्णा घोडे यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे गावडे घराण्याने राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीने गावडे कुटुंबाचे तिकीट कापल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिरूर तालुक्यात ZP, पंचायत समितीच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप…

जिल्हा परिषद निवडणूक! टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाचा ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय आढावा

शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून…

शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय उलथापालथ; राजकीय गणितांना मोठा धक्का…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

46 मिनिटे ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

4 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

6 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago