मनोरंजन

‘बिग बॉस मराठी 6’मध्ये मोठा धक्का! चर्चेत असलेली रुचिता जामदार घराबाहेर

धनंजय पोवारने उपस्थित केले प्रश्न

मुंबई: ‘बिग बॉस मराठी चा खेळ सध्या रंगात आला असून दर आठवड्याला नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या आठवड्यात घरातील सात सदस्य नॉमिनेट झाले होते. यामध्ये दिपाली सय्यद, रुचिता जामदार, प्राजक्ता शुक्रे, संस्कृती साळुंके, सागर कारंडे, प्रभू शेळके आणि तन्वी कोलते यांचा समावेश होता.

या सात जणांपैकी सर्वांत चर्चेत असलेली स्पर्धक रुचिता जामदार बिग बॉसच्या घरातून बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. रुचिता टॉप-5 स्पर्धकांमध्ये आपले स्थान पक्के करेल, अशी चर्चा असताना तिच्या एलिमिनेशनने प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दरम्यान, बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक धनंजय पोवार याने यावर प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत हा निर्णय पटलेला नसल्याचे म्हटले आहे.

धनंजय पोवार म्हणाला, “सोशल मीडियावर पाहायला मिळालं की रुचिता बाहेर पडली. याआधी रोशन भाजनकर ला खूप मतं मिळाली होती, तरीही तो बाहेर पडला. आता रुचितालाही भरपूर मतं मिळाली होती, असं ऐकायला मिळतंय. कारण मागचा पूर्ण आठवडा तिने बिग बॉसला भरपूर कंटेंट दिला होता. तरीही ती बाहेर गेली, हे थोडं आश्चर्यकारक आहे.”

दरम्यान, घराबाहेर आल्यानंतर रुचिता जामदारने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले. “या घरात प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली. अनेक वेळा नॉमिनेट झाले तरी प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मला लढण्याची ताकद मिळाली. घरात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफी मागते. आजचं एविक्शन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे, पण जनतेचा निर्णय मला मान्य आहे,” असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

14 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

22 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago