मनोरंजन

‘मुरांबा’मध्ये मोठा ट्विस्ट! रमा-अक्षय अखेर एकत्र; प्रोमो पाहून चाहत्यांचा जल्लोष

मुंबई: पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याच्या असतात. त्यातील कलाकारही घरातीलच सदस्य असल्यासारखे वाटतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात चांगलं घडावं, अशीच प्रेक्षकांची अपेक्षा असते. मात्र कथानक रंजक ठेवण्यासाठी मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जातात. असाच एक मोठा ट्विस्ट आता स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘मुरांबा’ मालिकेत पाहायला मिळत आहे.

‘मुरांबा’ ही मालिका आणि त्यातील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. गेल्या वर्षभरापासून या दोघांच्या नात्यात अनेक चढ-उतार दाखवण्यात आले. मालिकेने लीप घेतल्यानंतर रमाचा अपघात, तिच्या जागी माहीची एंट्री आणि इरावतीने मुद्दाम दोघांना दूर ठेवण्याचा प्रयत्न—या सगळ्या घडामोडींमुळे कथानकाला वेगळी कलाटणी मिळाली होती.

सध्या मालिकेत साई आणि रमाचं लग्न होणार असल्याचं चित्र रंगवलं जात होतं. मात्र ऐनवेळी कथानकाने नाट्यमय वळण घेतलं आहे. रमा थेट लग्नाच्या मंडपातून अक्षयसमोर येते आणि दोघांच्या प्रेमाला पुन्हा नवा अध्याय मिळतो. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये रमा ट्राफिक जाम करत गाडीच्या टपावर चढून अक्षयला हाक मारताना दिसते. हा सीन पाहून चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

सोशल मीडियावर या प्रोमोला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एका चाहत्याने लिहिलं, “खूप खूप सुंदर प्रोमो दाखवला आहे.” तर दुसऱ्याने ‘जा सिमरन जा…’चा संदर्भ देत, “जा रमा जा, तुझ्या अक्षयकडे,” अशी प्रतिक्रिया दिली. १४ फेब्रुवारीच्या पार्श्वभूमीवर प्रेमी युगुल एकत्र येणार याचा आनंद अनेकांनी व्यक्त केला आहे. “ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाच,” अशीही एक प्रतिक्रिया पाहायला मिळाली. तर काहींनी, “शेवटी रमा-अक्षय एकत्र दाखवलं, काय ते कंटाळवाणं चालू होतं,” असे म्हणत समाधान व्यक्त केले.एकूणच, ‘मुरांबा’ मालिकेतील हा ट्विस्ट प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरली असून, पुढील भागांमध्ये रमा-अक्षयच्या नात्याची नवी सुरुवात कशी रंगते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

13 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

22 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago