महाराष्ट्र

पदभार स्वीकारताच उपमहापौर परशुराम वाडेकर अ‍ॅक्शन मोडमध्ये

औंध-बोपोडी प्रभागात पहाटेच पाहणी

पुणे: पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदभार स्वीकारताच कामाला वेग देत अ‍ॅक्शन मोडमध्ये प्रवेश केला आहे. आज पहाटे ६ वाजताच त्यांनी औंध-बोपोडी प्रभागात प्रत्यक्ष फील्डवर उतरून विविध नागरी समस्यांची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात त्यांनी बोपोडी आरोग्य कोठी, नाईक चाळ, भीमज्योत नगर, सर्व्हे नं. २६ परिसर, पठाण चाळ, रेल्वे गेट, गांधी नगर, भोईटे चाळ तसेच मुंबई-पुणे रोडवरील गेट क्रमांक २० या भागांना भेटी देत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला.

यावेळी औंध वार्ड कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, ए.एस.आय. विनायक चोपडे, संतोष शेलार, मुकादम सोनम गायकवाड, सुपरवायझर पुरुषोत्तम कांबळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान ड्रेनेज लाईनची स्थिती, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, सार्वजनिक शौचालये व मुताऱ्यांची अवस्था, रस्त्यांची दुरवस्था तसेच पथदिव्यांबाबत नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची उपमहापौर वाडेकर यांनी सविस्तर दखल घेतली. या सर्व समस्यांवर तातडीने आणि प्रभावी कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नव्या पदावर रुजू झाल्यानंतर लगेचच प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केल्याने उपमहापौर वाडेकर यांच्या कार्यपद्धतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

12 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

20 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago