महाराष्ट्र

जिल्हा परिषद–पंचायत समिती निकाल! भाजपचा दबदबा, महायुतीला घवघवीत यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून, या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महायुतीला या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाले असून, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

या निकालांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला आहे. १२ जिल्हा परिषदांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून महायुतीची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे. ६० ठिकाणी भाजप पहिल्या क्रमांकावर आहे, तर शिवसेना दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस एका ठिकाणी नंबर वन पक्ष आहे.”

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “अतिशय सकारात्मक कल समोर आला आहे. भाजपने २०१७ चा स्वतःचा विक्रम मोडला आहे. २०१७ मध्ये भाजपला १४१ जागा मिळाल्या होत्या, तर यंदा निकाल पूर्ण होईपर्यंत २३६ जागा मिळाल्या आहेत.”

निवडणूक काळातील परिस्थितीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, “निवडणूक दरम्यान अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे मी स्वतः प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता.”

महायुतीतील सर्व सहकारी पक्षांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विशेष कौतुक केले. “राज्यातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम आणि योग्य कारभार करू,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भातील प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “सरसंघचालक जे विधान करतात त्यावर आम्ही भाष्य करत नाही. त्यांची वक्तव्ये दिशादर्शक असतात. विरोधी पक्ष केवळ माध्यमांपुरता मर्यादित आहे, जनतेमध्ये नाही. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल.”

दरम्यान, ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने जिल्हा परिषदांमध्ये पहिला क्रमांक कायम राखला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही १०० हून अधिक जागा जिंकत दमदार कामगिरी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

5 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

5 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

5 तास ago