मनोरंजन

बिग बॉस मराठी! भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखचा थेट अनुश्रीवर वार

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच दुसरा भाऊचा धक्का पार पडला असून, यावेळी सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनी थेट अनुश्रीची शाळा घेतली आहे. दुसऱ्या आठवड्यात घडलेल्या वादामुळे प्रेक्षकांमध्ये याची उत्सुकता होती आणि अखेर तो क्षण समोर आला आहे.

या आठवड्यातील राशन टास्कदरम्यान अनुश्री आणि प्राजक्ता यांच्यात वाद झाला होता. या वादात अनुश्रीकडून शिवीगाळ झाल्याचा आरोप प्राजक्ताने केला होता. ही बाब प्राजक्ताने आपल्या ग्रुपमधील सदस्यांना सांगितल्यानंतर दीपाली सय्यद यांनी अनुश्रीला जाब विचारला. त्यावेळी अनुश्रीने केलेले,

“आईला घेऊन आली होतीस… आता पप्पांना घेऊन ये!”

हे वक्तव्य घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही खटकलं होतं.

या घटनेवरूनच भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी अनुश्रीचा समाचार घेतला. प्रोमोमध्ये रितेश म्हणताना दिसतात,

“अनुश्री, जेव्हा प्राजक्ता दीपालीला घेऊन आल्या, तेव्हा तुम्ही काय म्हणालात? आईला घेऊन आलीस… जा आता बाबांना घेऊन ये!”यावर अनुश्री हसताना दिसल्याने रितेश अधिकच संतापले.”ए… लक्ष इथे! तिने भावाला आणलंय. हे ‘बिग बॉस’चं घर आहे. इथे मस्तीत नाही, शिस्तीत राहायचं!”असा थेट इशारा त्यांनी दिला.

रितेशचा रोख पाहून अनुश्री पूर्णपणे गोंधळल्याचं दिसून आलं. या प्रोमोवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.“किती आतुरतेने वाट पाहत होतो”, “भाऊ आला… मस्त झापलं”, “एक नंबर भाऊ”, “योग्यच उत्तर दिलं”, “असंच पाहिजे” अशा अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.दरम्यान, हा बहुचर्चित भाऊचा धक्का प्रेक्षकांना आज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

4 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago