महाराष्ट्र

‘मुंब्रा हिरवा करू’ वक्तव्यावरून राजकीय वाद! AIMIM नगरसेविका सहर शेख अडचणीत

मुंब्रा: ठाणे महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ३० मधून निवडून आलेल्या AIMIM पक्षाच्या नव्या नगरसेविका सहर शेख यांच्या विजय भाषणातील “पुढील पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करू” या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

२२ वर्षीय सहर शेख यांनी निवडणूक विजयाच्या आनंदात केलेल्या या वक्तव्याचा अर्थ धार्मिक असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. भाजपसह काही संघटनांनी या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी सहर शेख यांना समज देत नोटीस बजावली.

नोटिशीला उत्तर देताना सहर शेख यांनी आपला खुलासा दिला असून, “हिरवा” हा शब्द त्यांनी AIMIM पक्षाच्या झेंड्याच्या रंगाच्या संदर्भात आणि पर्यावरणपूरक विकास, वृक्षलागवड यासाठी वापरला असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजप महाराष्ट्राचे सह-मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी सहर शेख यांच्या वक्तव्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची भाषणे करताना जबाबदारीने बोलले पाहिजे. महाराष्ट्राची ओळख तिरंग्याशी आहे, कोणत्याही एका रंगाशी नाही.”

या संपूर्ण प्रकरणामुळे मुंब्रा परिसरात राजकीय वातावरण तापले असून, रंग, धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ होऊ नये, अशी मागणी विविध सामाजिक घटकांकडून केली जात आहे. लोकप्रतिनिधी हे कोणत्याही धर्माचे नसून ते सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी असतात, त्यामुळे भाषणात संयम आणि संविधानिक मूल्यांचे भान राखावे, अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे.या प्रकरणावर पुढील कायदेशीर कारवाई होणार की प्रकरण शांत होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago