मुख्य बातम्या

कारेगाव-रांजणगाव पंचायत समिती गणात नाणेकर-सोनवणे यांच्यामुळे सत्ताधाऱ्यांची झोप उडणार…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव-रांजणगाव पंचायत समिती गणात यंदा निवडणूक नाही, तर थेट बंड उसळले आहे. वर्षानुवर्षे पैसा, सत्ता आणि राजकीय मसल पॉवरच्या जोरावर निवडणुका जिंकणाऱ्यांसमोर आता सर्वसामान्य कार्यकर्ते छातीठोकपणे उभे ठाकले आहेत. आणि म्हणूनच हा गण संपूर्ण तालुक्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

कारेगाव पंचायत समिती गणातून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय ऊर्फ कुमार नाणेकर हे ‘तुतारी’ हाती घेत रणशिंग फुंकत मैदानात उतरले आहेत. तर रांजणगाव पंचायत समिती गणातुन संदीप सोनवणे हे कोणाच्याही दबावाला न झुकता अपक्ष म्हणून थेट लढतीत उतरले आहेत. विशेष म्हणजे या दोघांची एकच ओळख आहे ती म्हणजे सामान्य माणसाचा आवाज

या दोन्ही गणांत तिरंगी किंवा चौरंगी लढत अपेक्षित असली, तरीही जमिनीवरचं वास्तव मात्र वेगळंच चित्र दाखवत आहे. मोठे बॅनर्स, आलिशान गाड्यांचे ताफे आणि पैशांचा पाऊस असूनही ‘जनता मात्र दुर जातेय आणि सामान्य उमेदवारांकडे झुकतेय’ अशी कुजबुज आता उघडपणे या दोन्ही पंचायत समिती गणात ऐकू येऊ लागली आहे.

त्यामुळे वाडी-वस्तीवर, गावोगावी आणि चहाच्या टपरीपासून ते शेताच्या बांधावर एकच चर्चा आहे “यावेळी चिन्ह नको, काम करणारा माणूस हवा!” आणि “पैशाने नाही, तर कामाने मत मिळेल!” नाणेकर आणि सोनवणे यांचा प्रचार म्हणजे ‘जाहिरातबाजी नाही, तर थेट संवाद, थेट प्रश्न आणि थेट भूमिका’ त्यामुळेच पारंपरिक राजकीय समीकरणे कोलमडताना दिसत असून, सत्ताधारी गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, आतापर्यंत ‘ठरलेले निकाल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणात आता निकाल मतदार ठरवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शेवटच्या टप्प्यातील हालचाली पाहता, अमाप पैसा ओतूनही वातावरण फिरत नसल्याने काही गोटांत घबराट स्पष्ट दिसतेय.

एकूणच, कारेगाव–रांजणगाव पंचायत समिती गणात यंदाची लढत म्हणजे सत्ता विरुद्ध सत्य आणि धनदांडगे विरुद्ध सामान्य जनता तसेच राजकारण विरुद्ध जनकारण अशीच आहे. त्यामुळे आता निकाल काहीही लागो. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे कि या निवडणुकीने अनेकांची राजकीय गणिते बिघडवली आहेत आणि हाच गण शिरूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलू शकतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

6 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago