मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’च्या आजच्या भागात घरात पुन्हा एकदा सामान चोरीचा मुद्दा चांगलाच पेटला. दीपालीने सामानाबाबत विचारणा केल्यानंतर विशाल आणि रोशन यांनी प्रभूचा कप्पा तपासला. या कप्प्यातून तांदूळ, पीठ आणि इतर साहित्य सापडल्याने घरात खळबळ उडाली.
हे सामान कोणी लपवलं? हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. अनुश्रीने तन्वी आणि रुचिता यांच्यावर संशय व्यक्त केला. राकेशने प्रभूला थेट विचारणा केली असता प्रभूने याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. मात्र, ‘माझ्या कप्प्यात काहीही ठेवू नका, असं मी आधीच राकेशला सांगितलं होतं,’ असं प्रभू म्हणाला.
याचवेळी तन्वीने राकेशला उद्देशून, ‘आपण पीठ लपवणार होतो,’ असं विधान केल्याने वातावरण आणखी तापलं. यावरून स्पर्धकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. अनुश्रीने, ‘जे करता ते मान्य करण्याची हिंमत ठेवा,’ असा टोला लगावला.
तन्वीचा भावनिक उद्रेक
चोरीच्या आरोपांमुळे तन्वी अक्षरशः कोलमडली. कॅमेरासमोर बोलताना ती म्हणाली,‘मला हा शो करायचा नाहीये. सगळे असेच वागणार असतील तर आजच निर्णय घ्या, नाहीतर मला या घरात राहायचं नाही.’दीपाली, प्राजक्ता, राकेश आणि करण यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र सगळे आपल्याविरुद्ध बोलत असल्याची भावना झाल्याने तन्वी ओक्साबोक्शी रडली. आपल्या भूतकाळातील अनुभव सांगताना तन्वी भावूक झाली.‘चौथीत असताना माझ्याच मैत्रिणीने खडू माझ्या बॅगेत टाकले होते. तेव्हा माझ्यावर चोरीचा ठपका लागला आणि मला शाळा बदलावी लागली,’ असं ती म्हणाली.
गोल्डन रेशन कार्ड आणि जोड्यांचा ट्विस्ट
यानंतर बिग बॉस सर्व स्पर्धकांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावतात. चौथ्या आठवड्याची सुरुवात ‘सोनेरी’ करण्यासाठी सर्वांना गोल्डन रेशन कार्ड देत असल्याचं बिग बॉस जाहीर करतात. मात्र, सोन्याला किंमत असते, त्यामुळे आता ती किंमत मोजावी लागेल, असा इशाराही दिला जातो.
बिग बॉस स्पर्धकांना जोड्यांमध्ये बांधतात.
दीपाली – दिव्या
सागर – प्रभू
तन्वी – रुचिता
विशाल – ओमकार
राकेश – अनुश्री
रोशन – प्राजक्ता
आयुष – करण – सचिन
यापुढे बेल्ट काढण्यास मनाई असल्याचं बिग बॉस स्पष्ट करतात.
नॉमिनेशन टास्कमध्ये आरोप-प्रत्यारोप
यानंतर नॉमिनेशन टास्क पार पडतो. ब्राँझ आणि सिल्व्हर कुऱ्हाडीच्या माध्यमातून सदस्य एकमेकांना नॉमिनेट करतात. टास्कदरम्यान अनेक ठिकाणी शाब्दिक चकमकी, टोमणे आणि भावनिक क्षण पाहायला मिळाले.अनुश्रीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं. ओमकारने अनुश्रीला ‘निर्लज्ज’ म्हटलं, तर सचिनने चोरीच्या मुद्द्यावरून अनुश्रीला नॉमिनेट करताना भावूक होत रडू लागला.टास्कच्या शेवटी ओमकारने आपल्या जवळच्या मित्र आयुषला नॉमिनेट करताना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
चौथ्या आठवड्यात नॉमिनेट झालेले सदस्य
सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर खालील ९ सदस्य एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले आहेत.
ओमकार, आयुष, सचिन, प्रभू, दीपाली, अनुश्री, दिव्या, रोशन आणि राकेश.आता प्रेक्षक कोणाला वाचवणार आणि कोणाचा प्रवास थांबणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…