महाराष्ट्र

अजित पवारांच्या निधनाचा निवडणुकांवर परिणाम? सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीला मंत्रालयात प्रवेश करणार

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पवार कुटुंबीय दुःखातून सावरत हळूहळू राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रितीसंगम येथे जाऊन थोर नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

अजित पवार यांच्यावर बारामती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांचे अस्थिकलश राज्यभर कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी पाठवण्यात आले आहेत. आज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अस्थिकलशाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दुसरीकडे, बारामती येथे पवार कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. यामुळे सुनेत्रा पवार सध्या बारामतीतच मुक्कामाला आहेत.

दरम्यान, उद्याची नियोजित मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलण्यात आली असून या आठवड्यात कोणतीही मंत्रिमंडळ बैठक होणार नाही. अजित पवारांच्या निधनाची पार्श्वभूमी आणि राज्यातील सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीला मंत्रालयात

मंत्रिमंडळाची नियमित बैठक मंगळवारी होत असली तरी उद्याची बैठक रद्द झाल्याने नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित राहणार का, याबाबतची चर्चा संपुष्टात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार असून ९ फेब्रुवारी रोजी त्या प्रथमच मंत्रालयात उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, आजही बारामतीत अजित पवारांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

4 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

4 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

10 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

10 तास ago