hospital-sidi

Video: रुग्णालयात भुताटकी? रात्रीच्यावेळी लाकडी शिडी लागली आपोआप चालू…

महाराष्ट्र

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा भरवसा नाही. कधी मनोरंजक व्हिडीओ समोर येतात. तर काही व्हिडीओ हे अंगावर काटा आणणारे असतात. सध्या अशाच एका व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. एक लाकडी शिडी स्वत:हून चालताना दिसत आहे. त्या ठिकाणी भूत असल्याचे अनेकांचे मत आहे. भूतामुळेच हा सगळा प्रकार असल्याचा अनेकांनी दावा केला आहे.

लाकडी शिडीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. परंतु, हा व्हिडीओ किती खरा आणि किती खोटा असा प्रश्न देखील यावरुन उपस्थीत होत आहे. पण, या व्हिडीओचे सत्य काय आहे जाणून घेऊयात. स्वत:हून शिडी चालत असल्याचा हा व्हिडीओ उत्तराखंडमधील हॉस्पिटलमधील आहे असा दावा केला जात आहे. परंतू हा व्हिडीओ रुग्णालयाचा नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बेस हॉस्पिटलचे प्रभारी डॉ. अमित सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘शिडी चालण्याचा हा व्हिडीओ खोटा आहे. तंत्रज्ञानाच्या जगात असे व्हिडीओ संपादित करणे खूप सोपे आहे. विज्ञानाच्या भाषेत याला पॅसिव्ह डायनॅमिक वॉक म्हणतात. शिडी हलवण्याच्या व्हिडीओच्या मागे भूत नाही. उलट त्यामागे विज्ञान आहे. ज्यामध्ये कोणतीही वस्तू एकदा ढकलली तर ती आपोआप हलू लागते किंवा चालू लागते. वास्तविक हे न्यूटनच्या नियमांवर कार्य करते.

त्यामध्ये असे म्हटले आहे की, ‘एखादी वस्तू जर विश्रांतीवर असेल तर ती विश्रांतीवर राहील आणि जर ती हलत असेल तर ती स्थिर गतीने फिरत राहील. जोपर्यंत बाह्य शक्ती तिच्यावर कार्य करत नाही. त्याला जडत्वाचा नियम किंवा Law of Inertia असेही म्हणतात.’ बेस हॉस्पिटलचे प्रभारी डॉ. अमित सिंह यांनी व्हिडिओबाबत सांगितले की, ‘या संदर्भात तपास केला जात असून रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. आतापर्यंत कोणीही व्हिडिओ बनवताना पकडले गेले नाही.’

Video: फणा काढलेल्या कोब्रासोबत गाईने काय केले पाहा…

Video : म्हशीच्या अंगावर थाटात उभा राहून कुत्र्याचा स्वॅग…

Video : दुचाकीच्या हेडलाईटमध्ये बसवला टीव्ही अन् लावली गाणी…

Video: हा माणूस जुगाडचा बाप ठरला….

Video : गौतमी पाटील हिने बैलासमोर धरला ठेका; कारण…