मनोरंजन

गौतमी पाटील–राधा पाटील वादावर गौतमीचं शांत पण सडेतोड उत्तर; म्हणाली…

पुणे: लावणी या पारंपरिक नृत्यप्रकाराला ग्लॅमरची नवी ओळख मिळवून देणाऱ्या गौतमी पाटील आणि राधा पाटील या दोन कलाकार सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. दोघांचेही लावणी कॉन्सर्ट हाऊसफुल्ल होत असून चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. मात्र या लोकप्रियतेसोबतच दोघींमधील कथित ‘कोल्ड वॉर’ देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

अलीकडेच अभिजात मराठीला दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटीलने राधा पाटीलसोबतच्या वादावर पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली. “राधा पाटीलचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, असं ऐकायला मिळतं,” या प्रश्नावर गौतमी हसत म्हणाली, “हो, तिचं माझ्यावर खूपच जास्त प्रेम आहे. चांगली गोष्ट आहे. मी नेहमी सांगते—कुणी काहीही बोललं तरी मला फरक पडत नाही. एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. हाच माझा मंत्र आहे.”गौतमीनं दिलेल्या या शांत पण सडेतोड उत्तराचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

दरम्यान, याआधी एका मुलाखतीत राधा पाटीलने गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले होते. एका कार्यक्रमादरम्यान घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख करत राधा म्हणाली होती की, “मी कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर प्रेक्षकांनी जल्लोष केला, फोटो काढायला गर्दी झाली. तेव्हा गौतमीला राग आला.”

“त्यानंतर आयोजकांना ‘मला कुणासोबत डान्स करायला लावताय? तिची लेव्हल काय आहे?’ असे म्हणत माझा अपमान करण्यात आला,” असा आरोपही राधाने केला होता.इतकंच नाही तर बिग बॉसच्या घरात एन्ट्री करतानाही राधाने, “मी कुणालाही घाबरत नाही, समोर गौतमी पाटील का असेना,” असं वक्तव्य केलं होतं.

या सर्व वादावर प्रतिक्रिया देताना गौतमी म्हणाली, “आजकाल लोकांना माझं नाव घेऊन काहीही बोलायची सवय लागली आहे. मात्र माझे चाहते सोशल मीडियावर योग्य उत्तर देतात, याचा मला अभिमान आहे.”लावणीच्या मंचावर लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या दोन कलाकारांमधील वाद पुढे कोणतं वळण घेतो, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

15 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

22 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago