मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन मांडणी आणि दर्जेदार दिग्दर्शनामुळे ठसा उमटवणारा गोंधळ सध्या नव्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. थिएटरमध्ये यश मिळवल्यानंतर हा चित्रपट आता मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकला गेल्याची चर्चा रंगली असून, अधिकृत घोषणेअभावी तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
शिवजयंतीला चार आलिशान गाड्यांची खरेदी
चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर एकाच दिवशी तब्बल चार लक्झरी गाड्या खरेदी केल्याची माहिती समोर आली. सोशल मीडियावर या गाड्यांचे फोटो आणि पोस्ट्स व्हायरल झाल्यानंतर “हा सगळा ओटीटी डीलचा परिणाम तर नाही ना?” असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला.
सध्या त्यांच्या ताफ्यात मेबाखसह रेंज रोव्हर, डिफेंडर, बीएमडब्ल्यू आणि बीवायडी सीलायनसारख्या महागड्या गाड्यांची भर पडल्याची चर्चा आहे. सहा कोटी रुपयांच्या आसपास किंमत असलेल्या गाड्यांची एकाच वेळी खरेदी म्हणजे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे संकेत असल्याचे बोलले जात आहे. मात्र या व्यवहाराचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.
मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत करार?
चित्रपट नेटफ्लिक्स , ऍमेझॉन प्राईस व्हिडिओ किंवा झी 5 यांसारख्या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही सूत्रांच्या मते हा करार कोट्यवधी रुपयांत झाला असावा. मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसल्याने सर्वत्र उत्सुकता कायम आहे.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘गोंधळ’चा दबदबा
‘गोंधळ’ने केवळ व्यावसायिक यशच नाही तर पुरस्कारांच्या माध्यमातूनही आपला ठसा उमटवला आहे. ९९ वर्षांची परंपरा असलेल्या इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (फिप्रेस्को) कडून मिळालेला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण ठरला.
तसेच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रण असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. २२व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल २०२६मध्येही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान पटकावला.
याशिवाय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (इफ्फी) मधील इंडियन पॅनोरमा विभागात ५६ वर्षांत प्रथमच मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘सिल्व्हर पिकॉक’ पुरस्कार जिंकत राष्ट्रीय पातळीवर मोठी दखल मिळवली. नुकत्याच पार पडलेल्या झी चित्र गौरव अवॉर्ड्स २०२६ मध्येही ‘गोंधळ’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक असे पुरस्कार मिळाले.
अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
एकाच चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या यशामुळे मराठी सिनेसृष्टीचा मान उंचावला आहे. आता ‘गोंधळ’ नेमका कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी प्रदर्शित होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अधिकृत घोषणा होताच चित्रपट पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येणार, हे निश्चित मानले जात आहे.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…