मनोरंजन

रेवती लेले अडकली विवाहबंधनात! ‘हॅलो हसबंड’ म्हणत करून दिली ‘अहों’ची ओळख

मुंबई: मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेवती लेले आज विवाहबंधनात अडकली आहे. पुण्यात पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने तिचा आणि कौशिक भिडे यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नानंतर नवदांपत्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

रेवतीच्या आयुष्यातील लाइफ पार्टनर कोण?

रेवतीचा जीवनसाथी कौशिक भिडे असून तो सिनेइंडस्ट्रीशी संबंधित नसल्याची माहिती समोर येत आहे. तो खाजगी क्षेत्रात कार्यरत असल्याचं समजतं. काही दिवसांपूर्वी रेवतीने सोशल मीडियावर साखरपुड्याची अंगठी दाखवत प्रेमात पडल्याची कबुली दिली होती; मात्र होणाऱ्या पतीची ओळख गुप्त ठेवली होती. लग्नानंतर कौशिकने “हे यू” असे कॅप्शन देत फोटो शेअर केले. त्यावर रेवतीने “हॅलो हसबंड” अशी कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले.

पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

लग्नासाठी रेवतीने पिवळ्या रंगाची सुंदर साडी, नथ, मुंडावळ्या आणि हिरवा चुडा असा अस्सल मराठमोळा साज परिधान केला होता. साध्या आणि देखण्या लूकमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. तर कौशिकने लाल-पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता.

शुभेच्छांचा वर्षाव

रेवतीच्या या आनंदसोहळ्यात मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी झाले. अभिनेत्री हृता दुर्गुळे, समृद्धी केळकर, यशोमन आपटे, विशाल निकम आणि मधुरा जोशी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनीही “नांदा सौख्यभरे” म्हणत या जोडीवर आशीर्वादांचा वर्षाव केला.

रेवतीचा अभिनय प्रवास

रेवतीने स्वामिनी या मालिकेतील रमाबाई पेशवे यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. त्यानंतर लग्नाची बेडी मधील ‘मधुराणी’ ही तिची नकारात्मक भूमिका विशेष गाजली. अलीकडेच तिची कोण होतीस तू, काय झालीस तू ही मालिका संपली असून आता तिने वैयक्तिक आयुष्यात नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. मराठीसोबतच तिने हिंदी मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

3 मिनिटे ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

43 मिनिटे ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

2 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

19 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

22 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

22 तास ago